-->

आमखेडा ते दुबळवेल रस्ता श्रमदानातून केला पूर्ण

आमखेडा ते दुबळवेल रस्ता श्रमदानातून केला पूर्ण

 


साप्ताहिक सागर आदित्य/
आमखेडा ते दुबळवेल रस्ता श्रमदानातून केला पूर्ण

मालेगाव : दि.5 जाने : वाशिम जिल्ह्यातील दुबळवेल व आमखेडा रस्त्याचा प्रश्न अखेर दोन्ही गावातील गावकऱ्यांनी तात्पुरता मार्गी काढण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय ता.1 जानेवारी रोजी कृतीत आणून श्रमदानातून रस्त्याचे काम पूर्ण केले. जुन्या अकोला जिल्ह्यात मालेगाव आमखेडा,दुबळवेल,तोरणाळा,सांगा पार्डी टकमोर रस्ता प्रस्तावित होता दोन्ही बाजूकडून मालेगाव कडून आमखेडा पर्यंत पार्डी टकमोर पासून दुबळवेल पर्यंत रस्त्याचे काम करण्यात आले. परंतु दुबळवेल ते आमखेडा या दोन्ही गावांच्या मधील फक्त 600 फूट काम पांदण असल्यामुळे अडकले होते. स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्षणामुळे हे काम होऊ शकले नाही. शेवटी दोन्ही गावातील गावकरी एकत्रित बसून आमखेडा येथील कृषी विद्यालयाचे अविनाश जोगदंड यांच्या अध्यक्षतेखाली ता. 1 जानेवारी रोजी सदर रस्ता काम लोकसहभागातून करण्याची सुरुवात सामाजिक कार्यकर्ते सुभाष देव्हडे पाटील तथा जवळचे सर्वंच नागरिक तसेच आमखेडा येथील ग्रामपंचायत सरपंच व सदस्य दत्तराव रामकृष्ण जोगदंड व नितीन संजयराव जोगदंड जिल्हा सचिव राष्ट्रवादी युवक काँग्रेस वाशिम यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरू करण्यात आला. मागील चार दिवसात कच्चा रस्ता तयार करण्यात आला दोन्ही गावातील नागरिकाकडून स्थानिक लोकप्रतिनिधींना आता यापुढे हा रस्ता आम्हाला पक्का करून देण्यात यावा अशी मागणी होत आहे.

संबंधित विभाग लक्ष देईल का?

संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी पावसाळ्यापूर्वी सदर रस्ता पक्का न केल्यास श्रमदानाने तयार केलेला रस्ता वाहून जाऊ शकतो. अशी भीती श्रमदान करणाऱ्या कार्यकर्त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविली आहे. तरी संबंधित विभागाने या रस्त्याची पुढील दुरुस्ती करून रस्ता तयार करून देण्यात यावा अशी मागणी येथील स्थानिक नागरिक करीत आहेत.





0 Response to "आमखेडा ते दुबळवेल रस्ता श्रमदानातून केला पूर्ण"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article