-->

क्रांतीसुर्य सावित्रीबाई फुले यांची जयंती व बालिका दिन साजरा

क्रांतीसुर्य सावित्रीबाई फुले यांची जयंती व बालिका दिन साजरा

 


साप्ताहिक सागर आदित्य/

मालेगाव दि ४ जानेवारी : शहरातील दूर्गा चौक, मालेगाव येथील डॉ. रेणूताई कापूरे  यांचे पुढाकाराने महिला मंडळाच्या वतीने ३ जानेवारी रोजी क्रांतीजोती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली .                                        जयंतीउत्सव कार्यक्रमात सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला डॉ. कापुरे मॅडम यांनी पुष्पहार अर्पण करून प्रतिमेचे पूजन केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विनम्र अभिवादन केले. याप्रसंगी डॉ. रेणूताई कापूरे, सीमाताई कुलकर्णी, अश्विनी खरात इ. महिला भगिनींनी क्रांतीज्योती सावित्रीबाईं फुलेच्या जिवनावर आधारीत माहीती विषद केली.            सावित्रीबाईच्या विचारधारा महिलांनी अंगीकारणे हिच काळाची गरज आहे , त्यांनी महिलासाठी शिक्षणाची दारे खुली करून दिल्याने आज देशाच्या प्रत्येक क्षेत्रात महिलासुद्धा पुरुषांच्या बरोबरीने शिक्षणामुळे उभ्या आहेत, स्त्रि शिक्षणाची जननी म्हणून सावित्रीबाईंची आज घराघरात त्यांचा जयंतीउत्सव साजरा करून त्यांच्या स्मृतिंना आपण सर्वांनी आज विनम्र अभिवादन केलेच पाहीजे असे डॉ. कापुरे मॅडम यांनी मनोगतातून व्यक्त केले.यानंतर नगरपंचायतच्या माजी सभापती सुषमा सोनोने, सीमा कुलकर्णी मॅडम, अश्विनी खरात इ.आपले विचार व्यक्त करून या प्रसंगी विनम् अभिवादन केले.                  कार्यक्रमाला महिला मंडळातील जेष्ठ लक्ष्मीबाई सोनोने, खरात ताई, राजूरकर मॅडम, ढोले ताई, शर्मा ताई, यादव ताई, वैशाली कुलकर्णी, संचेती काकू, प्रभाबाई थोरात, गुप्ता मॅडम, रोकडे ताई, सुपले ताई, सारिका कान्हेड, लक्ष्मीबाई खरात, कालींदाबाई खरात, लक्ष्मी मगर, आशा खरात,जया अवचार, मनीषा खरात, यांचेसह बहुसंख्येने महिलांची उपस्थिती होती. तसेच रवी पाटील मगर, गणेश खरात, संदीप खरात, गजानन अवचार, सचिन पांडे व बाल विद्यार्थी यांचीसुद्धा उपस्थिती होती. जयंतीउत्सव कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक खरात यांनी केले तर आभार श्रीधर पेटकर यांनी  मानले.                फोटो :क्रांतीजोति सावित्रीबाई फुलेच्या जयंतीदिनी विनम्र अभिवादन करतांना मान्यवरासह उपस्थित महिला.






0 Response to "क्रांतीसुर्य सावित्रीबाई फुले यांची जयंती व बालिका दिन साजरा "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article