-->

जि. प. च्या महिला व बालकल्याण विभागाचा उपक्रम

जि. प. च्या महिला व बालकल्याण विभागाचा उपक्रम


साप्ताहिक सागर आदित्य/

 दि 3 ते 12 जानेवारी दरम्यान सावित्री-जिजाऊ जन्मोत्सव!

जि. प. च्या महिला व बालकल्याण विभागाचा उपक्रम

वाशिम दि, 3 जाने - जिल्हा परिषदेच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीपासुन ते माँ जिजाऊ यांच्या जयंती पर्यत म्हणजे दि. 3 ते 12 जानेवारी 2022 दरम्यान सावित्री- जिजाऊ जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. याची सुरुवात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करुन करण्यात आली.

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी याबाबत नुकतीच एक बैठक घेऊन महिला व बालकल्याण विभागासह सर्व विभागप्रमुखांना याबाबत निर्देश दिले होते. जि.प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनीही पत्र काढुन संबंधित यंत्रणेला निर्देश दिले आहेत.

जि.प.च्या सभागृहात सावित्री-जिजाऊ जयंतीनिमित्त जनजागृती उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी महिला व बाल कल्याण विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी  तुषार मोरे, जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेचे जिल्हा प्रकल्प संचालक डाॅ. विनोद वानखडे, जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन वेले, शिक्षणाधिकारी रमेश तांगडे,  उप शिक्षणाधिकारी गजानन डाबेराव यांची यावेळी उपस्थिती होती. 

महिला व बाल कल्याण विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे, शिक्षणाधिकारी रमेश तांगडे, महिला प्रतिनिधी पुष्पलता अफुने यांनी यावेळी  आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन राम श्रृंगारे यांनी केले. 


महिला व बाल कल्याणचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी जोल्हे म्हणाले, "दिनांक 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले  जयंती  महाराष्ट्रात

" महिला शिक्षण दिन" म्हणून म्हणून साजरी केली जाते. 

 गतवर्षीप्रमाणे अंगणवाडी व प्रकल्प स्तरावर जनजागृती कार्यक्रम, प्रभात फेरी, रांगोळी स्पर्धा असे विविध उपक्रम घेऊन पुढील 10 दिवस जनजागृती कहण्यात यावी."

सदर कार्यक्रम करताना  कोरोनाचे नियम व स्थानिक आचारसंहिता याचे पालन करावे असेही ते म्हणाले.

शिक्षणाधिकारी तांगडे म्हणाले कि "सावित्रीबाई फुलेंनी अतिशल प्रतिकुल परिस्थितीत महिलांच्या शिक्षणासाठी तसेच रमाजातील अनिष्ठ चालिरीती नष्ट करण्यासाठी पुढाकार घेतला. मात्र  प्रतिगामी व्यवस्थेचे म. जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचा छळ करुन त्यांच्या कार्यात अडथळा आणला." 










0 Response to "जि. प. च्या महिला व बालकल्याण विभागाचा उपक्रम"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article