
गवळी विद्यालयाचा संघ जिल्हास्तरावर
साप्ताहिक सागर आदित्य
गवळी विद्यालयाचा संघ जिल्हास्तरावर
अमानी:- मालेगाव तालुकास्तरीय शालेय खो-खो क्रीडा स्पर्धेमध्ये अमानी येथील स्व. शंकरराव गणुजी गवळी विद्यालयाचा १९ वर्षे वयोगटातील मुलांचा खो-खो संघ जिल्हास्तरासाठी पात्र ठरला. नुकत्याच संपन्न झालेल्या तालुकास्तरीय शालेय खो-खो क्रीडा स्पर्धा मालेगाव तालुक्यातील पिंपळा येथील श्री.पांडुरंग माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मैदानावर पार पडल्या. यामध्ये १४,१७,१९ वर्ष वयोगटातील मुलांच्या विविध संघांनी भाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये अमानी येथील स्व. शंकरराव गणुजी गवळी विद्यालयाचा संघ १९ वर्ष वयोगटांमध्ये अंतिम सामन्यांमध्ये पोहोचून जिल्हास्तरावर पोहोचला.
या संघामध्ये प्रतीक सरनाईक, कृष्णा गवळी,प्रतीक नालटे,साई देशमुख, साई खंडारे,ओम गवळी,संकेत गवळी, गोपाल गायकवाड,तन्मय गवळी, नितिन मुठाळ,साहिल खंडारे,करण झळके ओम मेटांगे, राजदिप खंडारे,इत्यादीचा समा इत्यादींचा समावेश होता या संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून तालुकास्तरावर आपले नावलौकिक दर्शविले या संघाला शाळेतील क्रीडा शिक्षक एन.डी. भिंगे यांनी मार्गदर्शन केले. शाळेत पार पडलेल्या छोटेखानी कार्यक्रमात विद्यालयाच्या संघाचं ज्ञानोपासक शिक्षण व स्वयंसेवी संस्था अमानीचे अध्यक्ष तथा विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल गवळी सर यांनी संघा मधील खेळाडूंचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व जिल्हास्तरासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी विद्यालयातील व्ही.के. खिल्लारे, आर.बी. नव्हाळे, पी. एस.सरनाईक, वि.भि. गवळी संदीप ठाकरे डी.जी. तागड इत्यादी उपस्थित होते.
0 Response to "गवळी विद्यालयाचा संघ जिल्हास्तरावर"
Post a Comment