
पालखी खांद्यावर घेऊन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी यांचा वृक्षदिंडीत सहभाग!
साप्ताहिक सागर आदित्य
'मेरी मिट्टी मेरा देश' अंतर्गत ऊंबरडा बाजार येथे रोप वाटिका
पालखी खांद्यावर घेऊन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी यांचा वृक्षदिंडीत सहभाग!
कारंजा, ऑगस्ट 'माझी माती माझा देश' अभियानांतर्गत ऊंबर्डा बाजार (ता. कारंजा) येथे जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षदिंडी काढुन अमृत रोपवाटिका तयार करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी यांच्या हस्ते ग्रांम पंचायतीच्या वतीने तयार करण्यात आलेल्या शिलाफलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी यांनी खांद्यावर पालखी खेऊन वृक्षदिंडीत सहभाग घेऊन गावकर्यांचा उत्साह वाढविला.
यावेळी जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे, सरपंच श्रीराज चौधरी, उप विभागीय आधीकारी, ललित कुमार वराडे, गट विकास अधिकारी प्रफुल्ल तोटेवाड , सहा गट विकास अधिकारी कैलास घुगे, विस्तार अधिकारी संजय भगत, मनोज रोकडे यांच्यासह ग्रामस्थांची मोठ्याप्रमाणात उपस्थिती होती.
माझी माती माझा देश या अभियानांतर्गत तयार करण्यात आलेल्याअमृत रोपवाटिकेमध्ये प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विविध प्रकारच्या फुलांची व देशी झाडे लावण्यात आली.
जिल्हाधिकारी बुवनेश्वरी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. शाळेतील मुला-मुलींशी संवाद साधला तसेच गावातील विकासकामांचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे संचालन वर्षा ठाकरे यांनी केले. प्रस्ताविक व आभार प्रदर्शन ग्राम विकास अधिकारी जयकिसन आडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता राजू बोडे, अरुण इंगोले, सुधाकर हळदे, अ. वहीद, अशोक उघडे, अशोक नेमाडे, गजानन महाराज भजनी मंडळ, सोपिनाथ भजनी मंडळ येवता यांच्या सदस्यांनी, आशा, अंगणवाडी सेविका आणि बचत गटाच्या महिलांनी परिश्रम घेतले.
0 Response to "पालखी खांद्यावर घेऊन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी यांचा वृक्षदिंडीत सहभाग!"
Post a Comment