-->

वसतिगृहात निवास व्यवस्था नसल्यास मुलामुलींनी प्रवेश घेऊ नये

वसतिगृहात निवास व्यवस्था नसल्यास मुलामुलींनी प्रवेश घेऊ नये

 


साप्ताहिक सागर आदित्य 

वसतिगृहात निवास व्यवस्था नसल्यास मुलामुलींनी प्रवेश घेऊ नये 

समाज कल्याण विभागाचे आवाहन

वाशिम जिल्ह्यात समाज कल्याण विभागाच्या अधिनस्त असलेल्या आश्रमशाळा आणि वसतिगृहाच्या मुख्याध्यापक व अधीक्षकांना सूचना देऊन मुलांमुलींच्या निवासाची व्यवस्था नसल्यास प्रवेश देवु नये असे निर्देश देण्यात आले आहे.निर्देश देऊनही आदेशाचे पालन आश्रमशाळाचे मुख्याध्यापक व वसतिगृहाचे गृहपाल करत नसतील तर त्यांच्यावर आश्रमशाळा संहिता शिस्त व अपील तरतुदीखाली कारवाई करण्यात येईल असे कळविले आहे. 

             जिल्ह्यातील आश्रमशाळांची नियमित तपासणी करण्यात येत आहे. तपासणीदरम्यान आढळून आलेल्या त्रुटींच्या अनुषंगाने संबंधीत आश्रमशाळेवर कठोर कारवाई करणार असल्याचे त्यांना कळविले आहे.मासिक सभेत आश्रमशाळा व वसतिगृहाच्या मुख्याध्यापक व अधीक्षकांना आश्रमशाळा संहितेनुसारच विद्यार्थ्यांना सोयीसुविधा देण्याबाबत व त्यामध्ये सातत्य ठेवण्याबाबत सक्त निर्देश देण्यात आले आहे.याबाबत कोणतीही  उणीव आढळून आल्यास संबंधितांवर प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करण्यात येईल तसेच कोणत्याही आश्रमशाळेत महिला अधिक्षिका तसेच पुरेशी निवास व्यवस्था व आश्रमशाळा संहितेनुसार सर्व सोयीसुविधा नसल्यास निवासी विद्यार्थी ठेवू नये.असे देखील कळविले आहे.त्यामुळे कोणत्याही आश्रमशाळा व वसतिगृहाबाबत समाज कल्याण विभागाचे संगनमत असण्याचा प्रश्नच उदभवत नसल्याची माहिती समाज कल्याणचे सहायक आयुक्त मारोती वाठ यांनी दिली.

Related Posts

0 Response to "वसतिगृहात निवास व्यवस्था नसल्यास मुलामुलींनी प्रवेश घेऊ नये "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article