
एक वसंतराव नाईक विद्यालय मानोरा येथे
साप्ताहिक सागर आदित्य
एक वसंतराव नाईक विद्यालय मानोरा येथे एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी अंतर्गत स्त्री पुरुष समानता व स्त्रियांचे आरोग्य यावर कार्यक्रम घेण्यात आला असता कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका सरोज सोळुंके या होत्या त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमात सुरुवात करण्यात आली यावेळी कार्यक्रमासाठी आरोग्य अधिकारी डॉक्टर ललित हेडा यांनी शाळेच्या मुलींना मार्गदर्शन करताना मुलींचे आरोग्य व्यवस्थित राहिले पाहिजे त्यासाठी मुलींनी दररोज सकस आहार घेणे गरजेचे आहे ज्यामुळे मुलींच्या रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण चांगले राहील आणि वेळोवेळी रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण चेक करणे गरजेचे आहे आणि आजच्या युगात मुलांना मुलींना फास्ट फूडचे फॅन खूप लागलेले आहे त्यामुळे त्याचा वाईट परिणाम आपल्या आरोग्यावर होत आहे असे मार्गदर्शन केले तर किरण पद्मगिरीवार मॅडम यांनी मुलींना मार्गदर्शन करताना निर्भयासारखे प्रकार न घडता आपण सर्व समस्यांना सामोरे जाऊन जागृत राहून शिक्षण घेतले पाहिजे मुलींना कमी लेखणी हे समाजात बऱ्याच प्रमाणात दिसून येते त्यावर मुलींनी मात करत आपले आरोग्य चांगले सुदृढ राहिले पाहिजे तरच आपण शिक्षण चांगल्या प्रकारचे घेऊ शकू असे संबोधित केले.यावेळी कार्यक्रमाचे आयोजन व संचलन दिपाली कांबळे पर्यवेक्षीका, ज्योती महल्ले, प्रमिलाताई पखाले, संध्याताई तेलतुंबडे,किरण ताई पद्मगिरीवार, आणि अंगणवाडी कर्मचारी,आशा वर्कर्स, शाळेच्या शिक्षिका,व शाळेच्या सर्व मुली उपस्थित होत्या शेवटी कार्यक्रमाची सांगता मुलींना खाऊ वाटप करून करण्यात आला
0 Response to "एक वसंतराव नाईक विद्यालय मानोरा येथे "
Post a Comment