
श्री पांडुरंग विद्यालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथी साजरी
साप्ताहिक सागर आदित्य
श्री पांडुरंग विद्यालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथी साजरी
पिंपळा:- येथील श्री.पांडुरंग माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय येथे दि.११ऑक्टोबर २०२२ रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ५४ वी पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य आर.एन. देशमुख सर तर प्रमुख पाहुणे म्हणून व्ही.ई. मोरे सर होते.
यावेळी वर्ग ८वीच्या विद्यार्थिनींनी 'खरा तो एकची धर्म' हे गीत सादर करून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. प्रास्ताविक पर भाषणामध्ये बी.ई.गवळी सर यांनी राष्ट्रसंतांचे विचार विद्यार्थ्यांना सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जी.डी. कोरडे सर यांनी तर आभार प्रदर्शन एन.डी. भिंगे सर यांनी केले
यावेळी वर्ग ५वी ते १२ वीचे विद्यार्थी बहूसंख्येने उपस्थित होते.
0 Response to "श्री पांडुरंग विद्यालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथी साजरी"
Post a Comment