
पैनगंगेत वाहून गेलेल्या वृद्धाचा मृतदेह काढला बाहेर.. वनोजाच्या रासेयो पथकाचे धाडसी कार्य.....
साप्ताहिक सागर आदित्य
पैनगंगेत वाहून गेलेल्या वृद्धाचा मृतदेह काढला बाहेर..
वनोजाच्या रासेयो पथकाचे धाडसी कार्य.....
१३ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता रिसोड तालुक्यातील हिवरा (पेन) येथे पैनगंगा नदीत सीताराम सरनाईक हे ८० वर्षाचे व्यक्ती वाहुन गेल्याची माहिती जिल्हा आपत्ति व्यवस्थापन अधिकारी शाहु भगत तसेच रिसोड तहसीलदार अजित शेलार सर यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संलग्नित ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक संस्था वनोजा व्दारा संचालित श्रीमती. साळुंकाबाई राऊत महाविद्यालय वनोजा रासेयो आपत्ति व्यवस्थापन बचाव पथकाचे समन्वयक प्रा.बापुराव डोंगरे यांना दिली. यानंतर प्रा. डोगंरे यांनी संबंधित माहिती पथकाचे अध्यक्ष व प्राचार्य डाॅ. देवेंद्र गावंडे यांना दिली. निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाच्या सदस्यांना सर्व सुरक्षा साहित्यांसोबत हिवरा पेन येथे सकाळीच रवाना केले. शोध मोहिमेला सुरूवात केली.३ तासाच्या शोध मोहिमेनंतर सुध्दा मृतदेह आढळून आला नाही.फक्त त्यांची टोपी व काठी आढळून आली.
यावेळी रिसोड तहसिलदार अजित शेलार यांनी घटनास्थळी भेट देऊन शोध कार्याचा आढावा घेतला. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहु भगत व प्रा.बापूराव डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष शोध मोहिम राबविली व तब्बल ५ तासानंतर घटनास्थळापासून ७ किमी अंतरावर वृद्धाचा मृतदेह एका खडकाला नदीच्या मधात आढळून आला. पथकाच्या सदस्यांनी वृद्धाचा मृतदेह बाहेर काढून प्रशासनाच्या व कुटुंबाच्या ताब्यात दिला.
यावेळी पथकाचे प्रविण गावंडे, ज्ञानेश्वर खडसे, सुमित राठोड, पुनेश राठोड,अनिकेत इंगळे,अभिषेक ठाकरे,नामदेव डाळ, विलास नवघरे, चंदन गव्हाने व गणेश शिंदे ( चालक) व रोशन लांभाडे आदिच्या मदतीने शोध मोहीम राबविण्यात आली तहसिलदार,मंडळ अधिकारी,तलाठी दिपक गोटे तसेच गावकऱ्याची यावेळी उपस्थिती होती.
0 Response to "पैनगंगेत वाहून गेलेल्या वृद्धाचा मृतदेह काढला बाहेर.. वनोजाच्या रासेयो पथकाचे धाडसी कार्य..... "
Post a Comment