-->

भारत माध्यमिक कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय रिसोड येथे 3 जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची 192 वी जयंती मोठ्या थाटात संपन्न

भारत माध्यमिक कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय रिसोड येथे 3 जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची 192 वी जयंती मोठ्या थाटात संपन्न

 


साप्ताहिक सागर आदित्य 

स्त्री शिक्षणाचा दीपस्तंभ म्हणजे सावित्रीमाई प्राचार्या मंजुषा सु. देशमुख

 रिसोड तालुक्यातील एकमेव मुलींची उपक्रमशील भारत माध्यमिक कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय रिसोड येथे 3 जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची 192 वी जयंती मोठ्या थाटात संपन्न करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सन्माननीय  प्राचार्या मंजुषा सु. देशमुख मॅडम होत्या तर प्रमुख अतिथी मंगला शेटे मॅडम,  प्रा. विजयमाला आसंनकर, प्रा. वृषाली  कल्याणकर,प्रा.दीपिका पुंड, 

प्रा.विजया कौटकर, प्रा. साधना बोरकर, रजनी नकवाल मॅडम, अश्विनी देशमुख मॅडम, मैथिली छत्रे मॅडम, प्रांजली लवंडे मॅडम या होत्या.तर  इयत्ता पाचवी ते बारावी च्या विद्यार्थिनींनी मोठ्या प्रमाणात यामध्ये सहभाग घेतला. सुरुवातीला सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. तदनंतर प्रा.पी. एच. मोरे यांनी आपल्या भाषणातून  सावित्रीबाईंनी अथक त्यागातून व  परिश्रमातून आजचा हा शिक्षण रुपी मळा कसा फुलला असे मनोगत व्यक्त केले. विजय भाऊ हराळकर सर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आजच्या प्रत्येक विद्यार्थिनीनी सावित्रीबाईंचा आदर्श घ्यायला हवा असे मनोगत व्यक्त केले. तसेच रजनी नकवाल  मॅडम  यांनी आपल्या  सुमधुर गीतातून सावित्रीबाईंच्या जीवनावर प्रकाश टाकला. इयत्ता अकरावी मधून साक्षी नंदकुले, भाग्यश्री सदार,पूनम भानुर्गे इयत्ता सातवी मधून सृष्टी रहिराव, कविता लकरस, साक्षी इंगळे, सोनाक्षी कांबळे, अनुष्का लोखंडे, मोनू गवळी व इयत्ता पाचवी मधून राधिका जाकोटिया, वेदिका जखोटिया, श्रुती मानवतकर, अक्षरा जाधव, अपूर्वा मोरे, ईश्वरी उफाड, प्राजक्ता भोसले वर्ग सहावी मधून कामखेडे, आरती गोल्हारे, कल्याणी खंडारे, प्रिया खोडके, रूपाली पवार, वैष्णवी शेळके, तनिष्का खिल्लारे,लक्ष्मी गवळी, या विद्यार्थिनींनी सावित्रीबाईंच्या जीवनावर भाषण रुपी प्रकाश टाकला. सामूहिक गीत गायनामध्ये सृष्टी सरकटे, अंकिता सरकटे,आरती मुळे, नम्रता वाळके इत्यादी विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सामूहिक गीत गायन केले. आरती गव्हाणे दिपाली खोडके, जीविका खोडके, श्रेया देशमुख,आराध्या खोडके, समृद्धी खोडके, समृद्धी देशमुख, वेदिका पडघान,  या विद्यार्थिनींनी उत्कृष्ट  नाटक सादर केले. शेवटी अध्यक्षीय समारोपिय भाषणातुन प्राचार्या मंजुषा सु. देशमुख मॅडम यांनी सावित्रीबाई यांच्या कार्याची आठवण करताना 3 जानेवारी हा भारतीय समाजाच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचा दिवस असून या दिवशी 1831 मध्ये भारतीय स्त्री मुक्तीच्या आणि स्त्री शिक्षणाच्या क्षेत्रातील प्रणेती क्रांतीज्योती सावित्रीबामाई फुले यांचा जन्म झाला. तसेच 1848 मध्ये   पहिली मुलींची शाळा स्थापन करून शिक्षणाच्या क्षेत्रात  नवा अध्याय सुरू केला. व महिलांच्या जीवनातील अंधकार दूर केला असे सूचक विधान आपल्या मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वेदिका गोंधळे व सहनिवेदीका कृतिका टिकाइत व आभार प्रदर्शन किरण पवार ह्या विद्यार्थिनींनी केले. कार्यक्रमासाठी बहुसंख्येने विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी इत्यादी उपस्थित होते.

0 Response to "भारत माध्यमिक कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय रिसोड येथे 3 जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची 192 वी जयंती मोठ्या थाटात संपन्न "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article