प्रा. गुलाब श्रीपत साबळे राज्यस्तरीय क्रांतीसुर्य -क्रांतीज्योती पुरस्कार2025 ने सन्मानित.
साप्ताहिक सागर आदित्य
प्रा. गुलाब श्रीपत साबळे राज्यस्तरीय क्रांतीसुर्य -क्रांतीज्योती पुरस्कार2025 ने सन्मानित. स्थानिक:- रिसोड तालुक्यातील गोभणी गावचे सुपुत्र आयुष्यमान प्रा.गुलाब चतुरामाई श्रीपत साबळे यांना शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, साहित्य , पत्रकरिता, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा ,पर्यावरण, अनेक बेरोजगारांना रोजगार अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पश्चिम महाराष्ट्रातील मानाचा समजला जाणारा भारत सरकार (ने.यु.के.) महाराष्ट्र शासन जिल्हा व राज्य जनकल्याण , सामाजिक सेवा संस्था कोल्हापूर. अंतर्गत , संत गजानन महाराज व्यसनमुक्ती साहित्य संमेलन शेगाव येथे दिनांक 5 जानेवारी 2025 रविवारला दशरात्रोउत्सवाचे औचित्य साधून पुरस्कार सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. ज्यांच्या शुभहस्ते पुरस्कार देण्यात आला निमंत्रक कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आमदार संजयजी गायकवाड, बाबासाहेब नेमाने राज्य निवेदक अहमदनगर, सिंधुताई सोरूके सामाजिक कार्यकर्ता वाशिम, डॉ.संतोष लिपटे शहराध्यक्ष शिवसेना शेगाव, शकुंतलाबाई भुज नगराध्यक्ष शेगाव, उदयसिंह पाटील व संगीता ताई पाटील कोल्हापूर या मान्यवरांच्या शुभ हस्ते *राज्यस्तरीय क्रांतीसुर्य -क्रांतीज्योती पुरस्कार 2025* या पश्चिम महाराष्ट्रातील सन्मानाचा समजला जाणाऱ्या विशेष पुरस्काराने सन्मानपत्र व ट्रॉफी मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक, धम्मकार्य, सांस्कृतिक , व्यसनमुक्ती, पत्रकारिता ,अंधश्रद्धा या उल्लेखनीय कार्याची पावती म्हणून प्रा. गुलाब चतुराबाई श्रीपत साबळे सरांना या अगोदर त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल जवळपास 27 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये राजर्षी शाहू महाराज आदर्श प्राध्यापक पुरस्कार, भारतीय राष्ट्रीय गुणवंत पुरस्कार, लोककला साधना गौरव सन्मान पुरस्कार, श्री.साईबाबा साधना गौरव पुरस्कार, कोल्हापुरी बाणा आदर्श शिक्षण भूषण राष्ट्रीय पुरस्कार, सामाजिक कृतज्ञता पुरस्कार, राष्ट्रीय जनसेवा लोक गौरव सन्मान पुरस्कार, श्री.शनिदेव कृपा गौरव राष्ट्रीय पुरस्कार ,राजीव गांधी राष्ट्रीय शैक्षणिक पुरस्कार, राष्ट्रीय कर्तव्य संस्कार पुरस्कार ,समाजसेवा राष्ट्रीय शिक्षा गौरव पुरस्कार, नेताजी सुभाष चंद्रबोस स्मृती गौरव पुरस्कार, राष्ट्रीय आदर्श प्राध्यापक शिक्षण गौरव पुरस्कार ,राज्यस्तरीय मानव सेवा शिक्षण युवा गौरव पुरस्कार . भारतीय राष्ट्रीय भारतीय राष्ट्रीय प्रतिभा गौरव पुरस्कार , राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, राजभाषा मराठी राष्ट्रीय सन्मान पुरस्कार , विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर सन्मान पुरस्कार .भीम रत्न राष्ट्रीय सन्मान पुरस्कार , राष्ट्रीय धम्म संगीती पुरस्कार, महात्मा फुले राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार ,साने गुरुजी आदर्श शिक्षक सन्मान पुरस्कार. राज्यस्तरीय आदर्श शिक्षक भूषण पुरस्कार व नुकताच मिळालेला *राज्यस्तरीय क्रांतीसुर्य- क्रांतीज्योती पुरस्कार 2025* ने. यु.के (भारत सरकार) संलग्न संस्था महाराष्ट्र शासन जिल्हा व राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त संस्था जनकल्याण सामाजिक सेवा संस्था कोल्हापूर अंतर्गत श्री. संत गजानन महाराज व्यसनमुक्ती साहित्य संमेलन,शेगाव विघ्नहर्ता श्री संत गजानन महाराज इंजिनिअरिंग कॉलेज जवळ खामगाव रोड, शेगाव जि. बुलढाणा येथे मोठ्या थाटात पार पडला. या संस्थेचे अध्यक्ष मा.उदयसिंह पाटील व संचालिका सौ. संगीता ताई पाटील हे असून यांनी उत्कृष्टरित्या कार्यक्रमाचे आयोजन केले . तसेच या कार्यक्रमाच्या प्रस्ताविकेतून या संस्थेची ओळख करून देत असताना समाजातल्या महाराष्ट्रातील निवडक हिऱ्यांचा, गुणवंतांचा सन्मान केला जातो. व त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली जाते असे प्रतिपादन प्रास्ताविकेतून केले. या कार्यक्रमाचे भारदार सूत्रसंचालन बाळासाहेब नेमाने यांनी केले. शेवटी आभार प्रदर्शन उदयसिंह पाटील यांनी केले.तरी हा पुरस्कार मिळाल्याबद्दल अनेक प्रशिक्षणार्थी ,विद्यार्थी, विद्यार्थिनी, सहकारी कर्मचारी वर्ग व स्नेहसील परिवारातील सदस्य तसेच सर्वत्र स्तरावर त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे..
0 Response to "प्रा. गुलाब श्रीपत साबळे राज्यस्तरीय क्रांतीसुर्य -क्रांतीज्योती पुरस्कार2025 ने सन्मानित. "
Post a Comment