
स्व. शांताताई शिंदे यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
साप्ताहिक सागर आदित्य
स्व. शांताताई शिंदे यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
शांतिनिकेतन
महिला विकास समिती वाशिम द्वारा संचालित महिला समुपदेशन केंद्र शहर पोलीस स्टेशन वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने गौरीशंकर विद्यालय नालंदा नगर वाशिम येथील शांताताई शिंदे यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, यामध्ये अध्यक्ष स्थानी संजय शिंदे सर हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून दिलीप गवळी सर यांची उपस्थिती होती, प्रमुख अतिथी म्हणून चांडक सर देखील उपस्थित होते, राजाभाऊ शिंदे ( जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी वाशिम )विजुभाऊ शिंदे( कोषाध्यक्ष ) सौ.वैशाली आरु ( अध्यक्ष शांतिनिकेतन महिला विकास समिती वाशिम ) यांच्यासह सर्व शिक्षक वृंद यावेळी उपस्थित होते, आयोजित रक्तदान शिबिरामध्ये समाजकार्य महाविद्यालय वाशिम येथील विद्यार्थ्यांनी रक्तदान दिले, यामध्ये 50 पेक्षा अधिक व्यक्तींनी रक्तदान केले, अध्यक्षा सौ.वैशाली आरू यांनी रक्तदान देऊन महत्त्व व रक्तदानाचे फायदे सांगितले यावेळी प्रमुख पाहुण्यांनी देखील आपले विचार व्यक्त केले,यावेळी शाळेचे मुख्याध्यापक काळे सर,बोबडे सर,मुठाळ सर, आव्हाळे सर, नप्ते सर,गेडाम मॅडम आदी उपस्थित होते..
0 Response to " स्व. शांताताई शिंदे यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न"
Post a Comment