-->

समान नागरी कायद्याबाबत अमरावती विभागाची जनसुनावणी २९ नोव्हेंबर रोजी

समान नागरी कायद्याबाबत अमरावती विभागाची जनसुनावणी २९ नोव्हेंबर रोजी

 


साप्ताहिक सागर आदित्य 

> समान नागरी कायद्याबाबत अमरावती विभागाची जनसुनावणी २९ नोव्हेंबर रोजी


 

          अमरावती  : समान नागरी कायद्याबाबत (युसीसी) विविध हितसंबंधी गट, संस्था व नागरिकांच्या सूचना, हरकती आणि मते जाणून घेण्यासाठी गठित करण्यात आलेल्या समितीद्वारे अमरावती विभागातील नागरिकांच्या जनसुनावणीचे आयोजन रविवार २९ नोव्हेंबर २०२६ रोजी नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय,अमरावती (समक्ष) व  संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कार्यालय (व्ही.सी. द्वारे) येथे करण्यात आले आहे.


          या अमरावती विभागातील नागरिकांच्या जनसुनावणीचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे राहणार आहे. रविवार २९ नोव्हेंबर २०२६ रोजी अकोला जिल्ह्यासाठी सकाळी ११ ते १२ या वेळेत, वाशिम जिल्ह्यासाठी सकाळी १२.३० ते दुपारी १.३० या वेळेत, बुलढाणा जिल्ह्यासाठी दुपारी २.३० ते दुपारी ३.३० या वेळेत, यवतमाळ जिल्ह्यासाठी दुपारी ४ ते सायंकाळी ५ या वेळेत आणि अमरावती जिल्ह्यासाठी सायंकाळी ५.३० ते सायं. ६.३० या वेळेत जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे. संबंधित गट, संस्था यांचे प्रतिनिधी आणि नागरिक यांना नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय,अमरावती किंवा संबंधित जिल्हाधिकारी कार्यालय येथे निर्धारित दिवशी,निर्धारित वेळेपुर्वी १ तास आधी सुनावणीकामी समक्ष उपस्थित राहता येईल. नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथील उपस्थितांची सुनावणी समितीसमोर समक्ष घेण्यात येईल व संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहणाऱ्या नागरीकांची सुनावणी व्हि.सी.व्दारे घेण्यात येईल.


          तसेच, ज्या नागरीकांना केवळ ऑनलाईन पध्दतीने आपले मत सादर करावयाचे आहे. त्यांना महाराष्ट्र शासनाच्या https://ucc.maharashtra.gov.in/ या पोर्टलवर ३७ मुद्दयांची माहिती देता येईल. असे अमरावती विभागाच्या विभागीय आयुक्त श्रीमती नयना गुंडे यांनी कळविले आहे.



0 Response to "समान नागरी कायद्याबाबत अमरावती विभागाची जनसुनावणी २९ नोव्हेंबर रोजी"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article