वसंतराव नाईक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
साप्ताहिक सागर आदित्य
वसंतराव नाईक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
मानोरा : वसंतराव नाईक विद्यालय, मानोरा येथे गुरुपौर्णिमेचा पावन उत्सव अत्यंत भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे अध्यक्ष सदाशिव भगत उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून शाळेच्या संचालिका
प्रमिलाताई भगत यांनी उपस्थिती लावली. तसेच शाळेचे मुख्याध्यापक प्रसेन भगत सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व गुरुपूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमेचे धार्मिक, सांस्कृतिक व शैक्षणिक महत्त्व, तसेच भारतीय गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात गुरुजनांप्रती आदर, कृतज्ञता आणि संस्कार जपण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
कार्यक्रमात इयत्ता आठवी 'अ'च्या विद्यार्थिनींनी गुरुमहिमेवर आधारित मनमोहक गीत सादर केले. तसेच विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगणारी प्रभावी भाषणे करून उपस्थितांची मने जिंकली.
या कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन व यशस्वी आयोजन शाळेच्या शिक्षकवृंदाच्या सहकार्याने करण्यात आले.
0 Response to "वसंतराव नाईक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी"
Post a Comment