हर घर तिरंगा अंतर्गत वसंतराव नाईक विद्यालयाची भव्य रॅली मानोरा
साप्ताहिक सागर आदित्य
हर घर तिरंगा अंतर्गत वसंतराव नाईक विद्यालयाची भव्य रॅली
मानोरा
: हर घर तिरंगा अभियानांतर्गत वसंतराव नाईक विद्यालय, मानोरा येथे देशभक्तीपर वातावरणात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. शाळेपासून सुरू झालेली ही रॅली पंचायत समिती, मानोरा येथे नेण्यात आली.
रॅलीमध्ये विद्यालयातील विद्यार्थी, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा ध्वज घेऊन देशभक्तीपर घोषणा देत नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेम व राष्ट्रीय एकतेचा संदेश दिला.
पंचायत समिती परिसरात पोहोचल्यानंतर गटविकास अधिकारी पुरोहित मॅडम यांनी रॅलीचे स्वागत केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना हर घर तिरंगा अभियानाचे महत्त्व सांगून राष्ट्रध्वजाचा सन्मान आणि देशाप्रती असलेल्या कर्तव्याची जाणीव करून दिली.
विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रसेन भगत सर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत तिरंगा हा देशाच्या एकता, अखंडता आणि अभिमानाचे प्रतीक असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी शिस्त व उत्साहाने सहभाग घेतल्याने रॅली उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
रॅली शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने यशस्वीरीत्या पार पडली. यावेळी वसंतराव नाईक विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
0 Response to "हर घर तिरंगा अंतर्गत वसंतराव नाईक विद्यालयाची भव्य रॅली मानोरा "
Post a Comment