-->

स्व.मायादेवी अशोककुमार बगडीया यांचे मरणोत्तर नेत्रदान

स्व.मायादेवी अशोककुमार बगडीया यांचे मरणोत्तर नेत्रदान



साप्ताहिक सागर आदित्य 

 स्व.मायादेवी अशोककुमार बगडीया यांचे मरणोत्तर नेत्रदान


रिसोड जि.वाशिम येथील रहिवासी अशोककुमार बगडीया (नगरसेठ) यांची पत्नी स्व. मायादेवी अशोकुमार बगडीया यांच्या वयाच्या ६५ व्या वर्षी दिनांक २४/१२/२०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता निधन झाले. त्यांच्या मागे बराच मोठा आप्त परिवार आहे तसेच संपुर्ण बगडीया कुंटुबातील आधारस्तंभ तथा सर्वाना सोबत घेऊन चालणाऱ्या तसेच समाजकार्याची आवड असलेल्या स्व. मायादेवी अशोककुमार बगडीया यांचे निधन झाल्याने संपुर्ण बगडीया कुटुंबावर दुःखाचा डोंगर उभा असताना बगडीया कुंटुबीयांनी एवढया दुखामध्येही मुत्यनंतर दोन अंधाच्या जीवनात प्रकाश निर्माण करण्यासाठी नेत्रदान करण्याची इच्छा व्यक्त करत एक आदर्श निर्माण केला.


त्यानूसार जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल कावरखे, अति. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अविनाश पुरी, नेत्र शल्यचिकित्सक, डॉ. आशिष बेदरकर, यांच्या मार्गदर्शनाखाली नेत्र चिकित्सा अधिकारी  ज्ञानेश्वर पोटफोडे व नेत्रदान समुपदेशक  रमेश ठाकरे,  ओम राऊत यांनी स्व. मायादेवी अशोककुमार बगडिया यांची नेत्र बुबुळे काढली व नेत्र बुबूळे त्याच दिवशी वैद्यकिय महाविद्यालय, अकोला येथे पाठविण्यात आली. तरी या नेत्रांच्या सहायाने दोन दृष्टि हिनांना पुन्हा प्रकाश पाहण्याची संधी उपलब्ध होणार असून बगडीया कुटुबिंयाच्या निर्णयाचे सर्वत्र कौतूक होत आहे. कुटूबिंयानी जनतेला संदेश देताना सांगितले की, नेत्रदान हि अत्यंत पवित्र व मानवतावादी कृती असुन, मृत्युनंतरही एखादयाच्या आयुष्यात प्रकाश देण्याची संधी यातुन मिळते. भारतात दरवर्षी हजारो लोक नेत्र मिळण्याच्या प्रतिक्षेत असतात. मात्र नेत्रदानाबाबत जागरुकतेच्या अभावामुळे आवश्यक तेवढी नेत्र उपलब्ध होत नाहीत. नेत्रदान करणे म्हणजे एखादयाला नवजिवन देणे. अशा कार्यात अधिकाधिक लोकांनी सहभागी व्हावे. सदरील नेत्रदान करण्याकरीता त्यांची मुले शिवकुमार बगडीया, महेश बगडीया, राजेश्वर बगडीया, मुलगी योगीता सुन मनिषा बगडीया नातवंड हर्षली, खुशी, रुद्रांश बगडीया तसेच अरुनकुमारजी बगडीया, डॉ. बगडे व समस्त बगडीया कुंटुबांचे सहकार्य लाभले.


तरी सर्व समाजातील गणमान्य व्यक्तींनी या नेत्रदान चळवळीत सक्रीय सहभाग घेवुन नेत्रदान चळवळ ही लोक चळवळ व्हावी. मृत्यूनंतर जवळच्या व्यक्तीचे त्वरीत नेत्रदान घडवून आणावे व नेत्रदाना नंतरच मृतावर अंतिम संस्कार करावे असे अवाहन जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. अनिल कावरखे यांनी केले असुन बगडीया कुटूंबाचे आभार मानले आहेत.


नेत्रदानासाठी संपर्क क्रं.९९२२५१९९४८ (जि.रु.वाशिम)

0 Response to "स्व.मायादेवी अशोककुमार बगडीया यांचे मरणोत्तर नेत्रदान"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article