प्रधानमंत्री आवास योजनेत उत्कृष्ट काम: सीईओ चौहान सहाय्यक प्रकल्प अधिकाऱ्यांचा सत्कार
साप्ताहिक सागर आदित्य
प्रधानमंत्री आवास योजनेत उत्कृष्ट काम: सीईओ चौहान
सहाय्यक प्रकल्प अधिकाऱ्यांचा सत्कार
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेचे काम उत्कृष्ट असल्याचे उद्गार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान यांनी काढले.
प्रधानमंत्री आवास योजना टप्पा १ आणि २ तसेच राज्य पुरस्कृत घरकुल योजना अंतर्गत जिल्ह्यातील घरकुलांच्या कामाचा सविस्तर आढावा घेण्यासाठी सीईओ चौहान यांनी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, सहायक प्रकल्प अधिकारी, ग्रामीण गृहनिर्माण अभियंता आणि संगणक परिचालक यांची बैठक (18 रोजी) आयोजित केली होती. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी किरण गणेश कोवे, जिल्हा ग्रामिण विकासचे सहायक प्रकल्प अधिकारी तथा जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक धैर्यशील पाटील यांची उपस्थिती होती.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रलंबित असलेल्या कामांना गती देण्याचे निर्देश तालुकास्तरावर कार्यरत यंत्रणेला दिले तसेच प्रलंबित असलेले घरकुलाचे कामे तात्काळ पूर्ण करण्याची ताकीद दिली.
-------------
घरकुलासाठी जागा उपलब्ध करून द्या:
घरकुलाचा कोणताही लाभार्थी घरापासून वंचित राहू नये याची विशेष दक्षता घेण्याची निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले. ज्या कुटुंबांना घर बांधण्यासाठी स्वतःची जागा नाही त्यांना ग्रामपंचायत मार्फत शासकीय जागा उपलब्ध करून देणे, अतिक्रमण नियमानुकूल करणे, गावातील नातेवाईकांची जागा मिळवून देणे हे पर्याय वापरून घरकुलाकरिता जागा उपलब्ध करून देण्याची निर्देशही यावेळी देण्यात आले.
----------
चौकट:
सहाय्यक प्रकल्प अधिकाऱ्यांचा सत्कार:
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत उत्कृष्ट काम करणारे नरेगा चे सहाय्यक प्रकल्प अधिकारी संदीप ज्ञानेश्वर खिल्लारे (जिल्हा परिषद वाशिम) आणि संजय गणेश राऊत (पंचायत समिती, कारंजा) यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ए.पी.ओ. संजय राऊत यांनी कारंजा तालुक्यातील 5047 पैकी 4436 मस्टर (88%) काढले आहेत. या कमी त्यांना जिल्हास्तरावर कार्यरत ए.पी.ओ. संदीप खिल्लारे यांची मदत झाली.
-------------
प्रधानमंत्री आवास योजनेचे जिल्ह्याचे उद्दिष्ट 69212 असून यापैकी 64243 लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण करण्यात आले आणि यापैकी 34067 लाभार्थ्यांचे मस्टर (हजेरीपत्रक) काढण्यात आले आहेत.
प्रधानमंत्री आवास योजना, तालुकानिहाय मस्टर (हजेरीपत्रक) उद्दिष्ट आणि साध्य:
तालुका, उद्दिष्ट, साध्य
कारंजा 5047, 4436
मालेगाव 14630, 5345
मंगरूळपीर 8368, 5938
मानोरा 13335, 7060
रिसोड 11526, 6350
वाशिम 10536, 4938
----------------------------
0 Response to "प्रधानमंत्री आवास योजनेत उत्कृष्ट काम: सीईओ चौहान सहाय्यक प्रकल्प अधिकाऱ्यांचा सत्कार "
Post a Comment