-->

 वसंतराव नाईक विद्यालय मानोरा येथे    "राष्ट्रीय हरित सेना",

वसंतराव नाईक विद्यालय मानोरा येथे "राष्ट्रीय हरित सेना",



साप्ताहिक सागर आदित्य 

 वसंतराव नाईक विद्यालय मानोरा येथे

  "राष्ट्रीय हरित सेना", 

वनराई इको- क्लब व सामाजिक वनीकरण विभाग वाशिम परिक्षेत्र मानोरा यांच्या संयुक्त विद्यमाने विविध पर्यावरण पूरक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. 

या कार्यक्रमाची सुरुवात हरित क्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. 

         या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक  प्रसेन भगत सर होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून  संजय नंदुरकर, (वनपरिक्षेत्र अधिकारी, मानोरा) हे उपस्थित होते. तसेच  डी.पी. सानप, साहेब (वनपाल मानोरा) यांच्यासह सामाजिक वनीकरण विभाग मानोरा येथील वनरक्षक कर्मचारी सौ पूजा मॅडम, शिल्पा मॅडम, व  पांडे यांची उपस्थिती होती. 

या कार्यक्रमात दरम्यान प्रमुख मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व, पर्यावरण संवर्धन, घनकचरा व्यवस्थापन तसेच टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू कशा तयार कराव्यात. व ओला कचरा व सुका कचरा याचे विघटन कशा प्रकारे केले जाते. याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. व त्यांनी विद्यार्थ्यांनी टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनवून आणलेले व सीड्स बॉल तयार करून आणलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. त्यानंतर वृक्षारोपण करण्यात आले.

 राष्ट्रीय हरित सेना व वनराई इको - क्लब, मानोराची प्रमुख शिक्षक, विकल सिंग राठोड सर,  निलेश उजवे सर व मोहसीन सर, यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल प्रयत्न केले.

या कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक वानखडे सर, जयस्वाल सर, एस. एम. भगत सर, भालेराव मॅडम, चातुरकर मॅडम, इंगोले मॅडम, सरनाईक मॅडम, इंगळे मॅडम, तायडे सर, मार्गे सर, ए व्ही भगत सर, पारधी सर, हे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

0 Response to " वसंतराव नाईक विद्यालय मानोरा येथे "राष्ट्रीय हरित सेना", "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article