-->

मनोरंजन क्षेत्रातील दूरदर्शन, चित्रपट आणि ओटीटी माध्यमांचा लाभ दिव्यांग व्यक्तींनाही सहज घेता यावा,

मनोरंजन क्षेत्रातील दूरदर्शन, चित्रपट आणि ओटीटी माध्यमांचा लाभ दिव्यांग व्यक्तींनाही सहज घेता यावा,



साप्ताहिक सागर आदित्य 

मनोरंजन क्षेत्रातील दूरदर्शन, चित्रपट आणि ओटीटी माध्यमांचा लाभ दिव्यांग व्यक्तींनाही सहज घेता यावा, 

यासाठी दिव्यांग सक्षमीकरण विभागाने पुढाकार घेतला आहे. दूरचित्रवाणी मराठी कार्यक्रमांमध्ये उच्च दर्जाचे समान भाषेतील उपशीर्षक (Same Language Subtitles-SLS) उपलब्ध करून देण्याबाबत विभागाने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, नवी दिल्ली आणि #प्लॅनेटरीड यांच्याशी सामंजस्य करार केला आहे.


या उपक्रमामुळे मराठी कार्यक्रमांतील संवाद त्याच भाषेतील स्पष्ट, अचूक, समकालिक आणि वाचनीय उपशीर्षकांसह प्रेक्षकांपर्यंत पोहोचतील. संवादांसोबत आवश्यक ध्वनीविषयक माहितीही उपशीर्षकांमधून मिळणार.


भाषिक विकास, डिजिटल समावेशन आणि दिव्यांग सक्षमीकरण या तीनही उद्दिष्टांना एकत्रितपणे गती देणारा हा उपक्रम आहे. दूरदर्शन वाहिन्या, चित्रपट निर्माते आणि ओटीटी मंच यांच्या सक्रिय सहभागातून उपशीर्षकांची गुणवत्ता, अचूकता आणि सातत्य राखण्यावर भर दिला आहे. दिव्यांग व्यक्तींना माहिती, मनोरंजन आणि डिजिटल माध्यमांचा समानतेने आनंद घेता यावा, या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. 

#दिव्यांगसक्षमीकरण

0 Response to "मनोरंजन क्षेत्रातील दूरदर्शन, चित्रपट आणि ओटीटी माध्यमांचा लाभ दिव्यांग व्यक्तींनाही सहज घेता यावा, "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article