चारा लागवडीचे नियोजन; ग्रामपंचायतींनी सक्रिय सहभाग नोंदवावा!
साप्ताहिक सागर आदित्य
जिल्ह्यात चारा लागवडीचे नियोजन; ग्रामपंचायतींनी सक्रिय सहभाग नोंदवावा!
जिल्ह्यातील पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने ‘व्हीबी-जी रामजी’ योजनेंतर्गत वैयक्तिक शेतकऱ्यांच्या शेतावर चारा लागवडीची कामे हाती घेण्यात येणार आहेत.
जिल्ह्यातील ४९१ ग्रामपंचायतींमध्ये चारा लागवडीचे नियोजन करण्यात आले असून, प्रत्येक ग्रामपंचायतीने सरासरी २० कामे घ्यावीत. ग्रामपंचायत, कृषी व पशुसंवर्धन विभागाने समन्वयाने कामे पूर्ण करून जून २०२७ पर्यंत चारा टंचाई भासणार नाही, यासाठी प्रयत्न करावेत.
चारा लागवड वाढवा, पशुधनाचे संगोपन बळकट करा!
#VBGRAMG #चारा_लागवड #पशुसंवर्धन #विकसितभारत
0 Response to "चारा लागवडीचे नियोजन; ग्रामपंचायतींनी सक्रिय सहभाग नोंदवावा!"
Post a Comment