-->

वाशिम शहरातील पाणीपुरवठा व रस्त्यांच्या समस्यांचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

वाशिम शहरातील पाणीपुरवठा व रस्त्यांच्या समस्यांचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

 


साप्ताहिक सागर आदित्य 

📍 वाशिम शहरातील पाणीपुरवठा व रस्त्यांच्या समस्यांचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा


शहरातील विविध ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी; नागरिकांच्या अडचणी तातडीने दूर करण्याचे निर्देश


वाशिम,  : वाशिम शहरातील विविध नागरी समस्या तसेच पाणीपुरवठ्याच्या अनुषंगाने सुरू असलेल्या कामांवर संबंधित विभागांनी समन्वयाने लक्ष देऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात. नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणींचे तातडीने निराकरण करण्यासाठी प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक कार्यवाही करावी, असे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी सांगितले.


शहरातील विविध ठिकाणी सुरू असलेल्या कामांची जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला. यावेळी वाशिम नगराध्यक्ष अनिल केंदळे, नगरपालिका सहआयुक्त डॉ. बाबुराव बिक्कड, मुख्याधिकारी अरविंद मुंढे, उपअभियंता चव्हाण, नगरपालिका सदस्य बापू भैय्या ठाकूर तसेच भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अभियंता उपस्थित होते.


महामार्ग प्राधिकरणाच्या सुरू असलेल्या कामामुळे निर्माण झालेल्या अडचणींची पाहणी करताना टेम्पल गार्डन परिसरातील सेवा रस्त्यालगत साचणारे पाणी तसेच मणिप्रभा हॉटेलसमोरील सेवा रस्त्याखालील पाणीवाहिनीची गळती तातडीने दुरुस्त करून घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिले. तसेच पाणी साचण्यासह इतर अडचणीही तातडीने दूर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.


जलशुद्धीकरण केंद्राच्या पाहणीदरम्यान गाळणी तळ बसविण्याच्या कामाचा आढावा घेण्यात आला. भारनियमनामुळे जलशुद्धीकरण प्रक्रियेवर परिणाम होऊ नये, यासाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचे नियोजन करण्यात आले असून, गरज भासल्यास अतिरिक्त वीजपुरवठ्याचीही तरतूद करावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. नागरिकांच्या अडचणींचे तातडीने निराकरण करण्यासाठी संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने कार्यवाही करावी, असेही त्यांनी सांगितले.


यावेळी संबंधित अधिकारी व कंत्राटदार उपस्थित होते.


#वाशिम #पाणीपुरवठा #रस्तेविकास #नागरीसमस्या #वाशिमनगरपालिका #प्रशासन #नागरिकसेवा

0 Response to "वाशिम शहरातील पाणीपुरवठा व रस्त्यांच्या समस्यांचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article