-->

राज्यात चारा टंचाई निर्माण होऊ नये,

राज्यात चारा टंचाई निर्माण होऊ नये,

 


साप्ताहिक सागर आदित्य 

चारा टंचाईवर मात करण्यासाठी ‘चारा बँक’ आणि एसओपी!  


राज्यात चारा टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या समन्वयाने ‘चारा बँक’ स्थापन करावी. तसेच चारा उपलब्धता, साठवणूक आणि वितरणाचे योग्य नियोजन करण्यासाठी प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) तयार करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. ज्या जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त चारा उपलब्ध आहे, तेथून लगतच्या चारा टंचाईग्रस्त जिल्ह्यांना चारा पुरवठा करण्यात येणार आहे. याशिवाय, ६२ कोटी रुपयांच्या निधीतून चारा बियाण्यांचे वाटप केले जाणार असून, शाश्वत पाण्याची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध करून देत चारा उत्पादनाला प्रोत्साहन दिले जाणार आहे. तसेच, शासनाच्या संस्थांमार्फत हमीभावाने चारा खरेदी करण्यात येणार आहे. धरणांच्या गाळपेर जमिनीवर स्थानिक शेतकऱ्यांच्या माध्यमातून चारा पिकांच्या लागवडीला प्राधान्य दिले जाणार आहे. 



0 Response to "राज्यात चारा टंचाई निर्माण होऊ नये, "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article