-->

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, उमराळा येथील सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी नवरात्रोत्सवाच्या मंगलमय पर्वात उत्स्फूर्त सहभाग

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, उमराळा येथील सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी नवरात्रोत्सवाच्या मंगलमय पर्वात उत्स्फूर्त सहभाग



 साप्ताहिक सागर आदित्य 

नवरात्रोत्सवातून साक्षरतेचा जागर! जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उमराळा यांचा जनजागृतीचा प्रेरणादायी उपक्रम! 

नवभारत साक्षरता अभियान अंतर्गत जनजागृती करण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, उमराळा येथील सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी नवरात्रोत्सवाच्या मंगलमय पर्वात उत्स्फूर्त सहभाग घेत गावामध्ये साक्षरतेचा संदेश पोहोचवला. 

मुख्याध्यापक कु. मेघा जाधव मॅडम व शिक्षक रामेश्वर साळसुंदर यांनी या कामी पुढाकार घेतला.

🎯 “प्रत्येकाने शिकावे, प्रत्येकाने शिकवावे; साक्षरतेचा दीप प्रत्येक घरात लावावा!”

विद्यार्थ्यांच्या हातातील जनजागृतीपर फलक आणि त्यांच्या माध्यमातून दिला जाणारा साक्षरतेचा संदेश हे या उपक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. धार्मिक उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक जाणीव जागृत करून निरक्षरता निर्मूलनासाठी लोकसहभाग वाढवण्याचा हा स्तुत्य प्रयत्न आहे.

 विद्यार्थ्यांच्या सहभागातून समाजप्रबोधन, शिक्षकांच्या 

पुढाकारातून साक्षरतेचा विस्तार आणि लोकसहभागातून साक्षर भारताचे स्वप्न! 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, उमराळा येथील सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी राबविलेल्या या अभिनव आणि 

समाजोपयोगी उपक्रमाचे मनःपूर्वक अभिनंदन! 

 चला, साक्षरतेचा दीप उजळूया…

निरक्षरतेचा अंधार दूर सारूया!

✍️ संभाजी साळसुंदर

केंद्र समन्वयक, समूह साधन केंद्र, अनसिंग

0 Response to "जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, उमराळा येथील सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी नवरात्रोत्सवाच्या मंगलमय पर्वात उत्स्फूर्त सहभाग "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article