मृत्युनंतरही डोळयांतुन जिवंत राहणार पंढरी वसंता मांदळकर
साप्ताहिक सागर आदित्य
मृत्युनंतरही डोळयांतुन जिवंत राहणार पंढरी वसंता मांदळकर
यांची माणुसकी मरनोत्तर नेत्रदानाचा प्रेरणादायी निर्णय
मृत्यु हा जिवनाचा शेवट असला, तरी माणुसकीचा अंत होऊ नये, याचा आदर्श घालुन देणारे कार्य रिसोड तालुक्यातील मौजे केशवनगर येथील पंढरी मांदळकर वय ३१ वर्ष यांच्या कुटुंबीयांनी केले आहे. पंढरी मांदळकर यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी दुःखाच्या प्रसंगी धैर्याने निर्णय घेत मरनोत्तर नेत्रदान केले. त्यांच्या या निर्णयामुळे त्यांच्या डोळयामधुन गरजु व्यक्तींच्या आयुष्यात पुन्हा प्रकाश येण्याची आशा निर्माण झाली आहे.
आपल्या जिवलग व्यक्तीच्या निधनानंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असतांना नेत्रदानाचा निर्णय घेणे निश्चीतच सोपे नसते. मात्र पंढरी मांदळकर यांच्या कुटुंबीयांनी भावनिक दुःखावर मात करत सामाजीक बांधीलकी जंपली. त्यांच्या या निर्णयाने सर्व स्तरातून कौतुक होत असुन समाजात नेत्रदानाबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी हि घटना महत्वपुर्ण ठरणार आहे.
पंढरी मांदळकर यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी आपल्या व्यक्तीचे डोळे एखाच्या गरजु व्यक्तीच्या आयुष्यात प्रकाश आणु शकतील तर त्यापेक्षा मोठी श्रध्दांजली कोणती? या भावनेतुन नेत्रदानाचा निर्णय घेतला. या घटनेने पंढरी मांदळकर यांच्या स्मृती कायमस्वारुपी जिवंत राहण्याबरोबरच इतरांच्या जिवनात आशेचा किरण निर्माण होणार आहे. नेत्रदानातुन मिळतो नव्या आयुष्याचा प्रकाश नेत्रदान हे दान नसुन एका गरजु व्यक्तीला दृष्टी मिळवुन देण्याची मानवतेची सेवा आहे. अनेक व्यक्तींना कॉर्नियाशी संबधीत अंधत्वामुळे दृष्टीची समस्या असते. अशा वेळी मरनोत्तर नेत्रदानातुन मिळालेल्या कॉर्नियांचा उपयोग दृष्टी पुनर्स्थापनेसाठी केला जाऊ शकतो.
पंढरी मांदळकर यांच्या मरनोत्तर नेत्रदानामुळे माणुस जातो पन त्याची माणुसकी मागे राहते, हा संदेश अधोरखीत झाला आहे. त्यांच्या कुटुंबीयांना घेतलेला हा निर्णय समाजातील इतर नागरीकांसाठीही प्रेरणादायी ठरावा, अशी अपेक्षा व्यक्ती होत आहे. मृत्युनंतर शरीर नश्वर नसले तरी एखादयाच्या आयुष्यात प्रकाश देण्याची संधी कायमची अमर ठरु शकते, याचे सुंदर उदाहरण पंढरी मांदळकर यांच्या मरनोत्तर नेत्रदानातुन समोर आले आहे. मांदळकर परीवाराची अंतिम इच्छा जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल कावरखे, अति. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अविनाश पुरी, नेत्र शल्यचिकित्सक, डॉ. आशिष बेदरकर, डॉ. डाखोरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली नेत्रदान समुपदेशक रमेश ठाकरे नेत्रचिकित्या अधिकारी सुधिर साळवे, ओम राऊत यांनी मरनोत्तर नेत्र बुबूळे काढून पुर्ण केली व नेत्र बुबुळे त्याच वेळेस शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला येथे पाठविण्यात आली. सदर नेत्रदानासाठी विजय जाधव,
गौरिशंकर तेलंगे, विठठल मांदळकर, ऋषिकेश मांदळकर,
संतोष मांदळकर प्रविन ढोके, रवि कांबळे, उकंडी, यांनी विशेष प्रयत्न केले.
तरी सर्व समाजातील गणमान्य व्यक्तींनी या नेत्रदान चळवळीत सक्रीय सहभाग घेवुन नेत्रदान चळवळ ही लोक चळवळ व्हावी. मृत्यूनंतर जवळच्या व्यक्तीचे त्वरीत नेत्रदान घडवून आणावे व नेत्रदाना नंतरच मृतावर अंतिम संस्कार करावे असे अवाहन जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. अनिल कावरखे यांनी केले असुन मांदळकर कुटूंबाचे आभार मानले आहेत.
नेत्रदानासाठी संपर्क क्रं. ९९२२५१९९४८ (जि.रु. वाशिम)
0 Response to "मृत्युनंतरही डोळयांतुन जिवंत राहणार पंढरी वसंता मांदळकर "
Post a Comment