तुळजापूर निवासी शाळेत सामूहिक वाचनातून ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा
साप्ताहिक सागर आदित्य
तुळजापूर निवासी शाळेत सामूहिक वाचनातून ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा
सेवा संकल्प अभियानांतर्गत ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन
वाशिम, : सेवा संकल्प अभियानांतर्गत मंगरूळनाथ तालुक्यातील तुळजापूर येथील अनुसूचित जाती मुलांच्या शासकीय निवासी शाळेत भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी एक तास सामूहिक वाचन केले. तसेच शाळेत ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.
शाळेचे मुख्याध्यापक एल. झेड. सुरजुसे यांनी ‘वाचनाचे महत्त्व’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. वाचनामुळे ज्ञानात भर पडते, विचारशक्ती विकसित होते आणि व्यक्तिमत्त्व घडण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले.
या उपक्रमात शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी आणि बाह्यस्रोत कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.
#वाचनप्रेरणादिन #सेवासंकल्पअभियान #वाचनसंस्कृती #वाशिम #जिल्हामाहितीकार्यालयवाशिम
0 Response to "तुळजापूर निवासी शाळेत सामूहिक वाचनातून ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा"
Post a Comment