जिल्ह्यात ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील ४९१ ग्रामपंचायतींसह अंगणवाड्या, जिल्हा परिषद शाळा आणि पंचायत समित्यांच्या माध्यमातून स्वच्छतेविषयक विविध उपक्रम
साप्ताहिक सागर आदित्य
स्वच्छ वाशिमसाठी जिल्हाभर स्वच्छतेची लोकचळवळ!
📢 सेवा संकल्प अभियानांतर्गत ४९१ ग्रामपंचायतींसह अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा व पंचायत समित्यांचा सहभाग
वाशिम, : सेवा संकल्प अभियानांतर्गत स्वच्छ भारत मिशनच्या वतीने जिल्हा परिषद वाशिममार्फत संपूर्ण जिल्ह्यात ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील ४९१ ग्रामपंचायतींसह अंगणवाड्या, जिल्हा परिषद शाळा आणि पंचायत समित्यांच्या माध्यमातून स्वच्छतेविषयक विविध उपक्रम राबवून स्वच्छ, सुंदर आणि निरोगी परिसर निर्माण करण्यावर भर देण्यात येत आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कोवे आणि स्वच्छ भारत मिशनचे प्रकल्प संचालक गजानन खुळे यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. सर्व गटविकास अधिकाऱ्यांच्या समन्वयातून ग्रामीण भागात स्वच्छतेच्या उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
या अभियानांतर्गत ग्रामपंचायत स्तरावर सार्वजनिक परिसराची स्वच्छता, अंगणवाडी व जिल्हा परिषद शाळांमध्ये स्वच्छतेविषयक जनजागृती तसेच पंचायत समित्यांच्या माध्यमातून स्वच्छता उपक्रमांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. कचऱ्याची योग्य विल्हेवाट, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, आरोग्यदायी वातावरण आणि पर्यावरण संवर्धन याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यावर भर दिला जात आहे.
स्वच्छता ही केवळ मोहिमेपुरती मर्यादित न राहता ती लोकचळवळ व्हावी आणि स्वच्छतेची सवय नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून लोकसहभाग वाढवून स्वच्छ वाशिम घडविण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन प्रयत्नशील आहे.
स्वच्छता ही सेवा, स्वच्छता ही जबाबदारी!
#सेवा_संकल्प_अभियान #स्वच्छता_ही_सेवा #स्वच्छभारत_मिशन #जिल्हा_परिषद_वाशिम #स्वच्छ_वाशिम #लोकसहभाग
0 Response to "जिल्ह्यात ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील ४९१ ग्रामपंचायतींसह अंगणवाड्या, जिल्हा परिषद शाळा आणि पंचायत समित्यांच्या माध्यमातून स्वच्छतेविषयक विविध उपक्रम "
Post a Comment