दुबळवेल येथे महाप्रसाद व किर्तन सोहळा प्रख्यात किर्तनकार ह भ.प.पुंडलिक महाराज,शेगाव यांचे किर्तन
साप्ताहिक सागर आदित्य
नवसाला पावणारी आई जगदंबा कुलस्वामिनी
माँ जगदंबा देवी सेवाऐ समिती ट्रस्ट, दुबळवेल र.नं.ई ३६९ वा संचलित द्वारा
श्री भवानी देवी संस्थान, दुबळवेल ता. मालेगाव जि. वाशिम
देवीविषयी आणि मंदिराविषयी थोडक्यात माहिती
ग्रामदेवताः विदर्भातील भाविकांचे श्रद्धास्थान दुबळवेल ची श्री.भवानी माता
वाशिम जिल्ह्यातील दुबळवेल हे गाव संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध आहे ते येथील ग्रामदैवत भवानी मातेच्या मंदिरामुळं जागृत देवस्थान अशी दुबळवेलच्या भवानी मातेची ओळख आहे आदिशक्तीची अनेक शक्तिपीठे महाराष्ट्रत आहेत वाशिम जिल्ह्यातील देवीच्या अनेक शक्तीपीठांनी येथील अध्यात्मिक विश्व समृद्ध केलं आहे. वाशिम जिल्ह्यातील दुबळवेल गावची अध्यात्मिक ओळख रूढ आणि मजबूत केली ते येथील भवानी मातेच्या मंदिराने. विश्वस्थ मंडळाच्या कल्पनेतुन सध्या या मंदिर परिसरचा झपाटयाने विकास सुरु आहे. नवरात्रासह आखाडीपासुन ( गुरुपौर्णिमा) ते नवरात्र पर्यंत दर मंगळवारी येथे भक्तांची मोठी गर्दी झालेली असते. येथील भवानी माता हे माहूरचे आरधे शक्तीपिठ मानले जाते.
निसर्गाच्या सानिध्यात वसलेले देवीचे हे मंदिर अत्यंत रमनिय ठिकाण आहे. फार पुरातन काळापासून देवी येथे विराजमान आहे भक्तांना पावनारी हाकेला धावून येणारी आहे नवसाला पावणारी कुलस्वामिनी अशी या देवीची ओळख आहे. देवीचे हे ठिकाण अंदाजे ३०० ते ४०० वर्षापुवी चे मानले जाते येथील जुन्या मंदिराची
अवस्था बेकार झाली असल्या कारणाने येथील गावकर्यांनी मंदिराचा जिर्णोद्धार केला.तसेच नवमी दिवशी दि.19/09/2026 सोमवार ला भव्य महाप्रसाद व किर्तन सोहळा प्रख्यात किर्तनकार
ह भ.प.पुंडलिक महाराज,शेगाव यांचे किर्तन
सकाळी 10 ते 12 या वेळेत होईल सोबत वारकरी भजनी मंडळ दुबळवेल,गुंज,जोडगव्हाण,कार्ली,तोरनाळा,बोराळा पंचक्रोशीतील भजनी मंडळी यांचे सहकार्य असेल. नंतर लगेच महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे.तरी सर्व भाविक भक्तांनी किर्तनाचा व महाप्रसाद चा लाभ घ्यावा असे आयोजक मॉं जगदंबा देवी सेवा समिती ट्रस्ट दुबळवेल द्वारा संचालित श्री.भवानी देवी संस्थान, दुबळवेल व गावकरी मंडळी दुबळवेल .ता.मालेगांव जि.वाशिम यांनी केले आहे.
0 Response to " दुबळवेल येथे महाप्रसाद व किर्तन सोहळा प्रख्यात किर्तनकार ह भ.प.पुंडलिक महाराज,शेगाव यांचे किर्तन "
Post a Comment