-->

सेवा संकल्प अभियानातून तुळजापूर निवासी शाळेत आरोग्य, स्वच्छता व व्यसनमुक्तीचा जागर

सेवा संकल्प अभियानातून तुळजापूर निवासी शाळेत आरोग्य, स्वच्छता व व्यसनमुक्तीचा जागर

 


साप्ताहिक सागर आदित्य 

सेवा संकल्प अभियानातून तुळजापूर निवासी शाळेत आरोग्य, स्वच्छता व व्यसनमुक्तीचा जागर


‘विकसित भारत’ निबंध स्पर्धेसह विविध उपक्रम उत्साहात


वाशिम,  : सेवा संकल्प अभियानांतर्गत अनुसूचित जाती मुलांची शासकीय निवासी शाळा, तुळजापूर, ता. मंगरूळपीर, जि. वाशिम येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये आरोग्य तपासणी, स्वच्छता अभियान, ‘विकसित भारत’ विषयावर निबंध स्पर्धा आणि व्यसनमुक्तीविषयक स्पर्धांचा समावेश होता. या उपक्रमांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.


विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहावे आणि त्यांच्यामध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच शाळेच्या परिसरात स्वच्छता अभियान राबवून स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले. स्वच्छ परिसर, वैयक्तिक स्वच्छता आणि आरोग्यदायी सवयी यांविषयी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यात आले.


देशाच्या विकासात युवकांची भूमिका आणि विकसित भारताची संकल्पना विद्यार्थ्यांना समजावी, यासाठी ‘विकसित भारत’ या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली. तसेच व्यसनांचे दुष्परिणाम समजावून सांगून व्यसनमुक्त जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी व्यसनमुक्तीविषयक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, स्वच्छतेची आवड, राष्ट्रविकासाविषयी सकारात्मक दृष्टिकोन आणि व्यसनमुक्तीबाबत जागरूकता निर्माण करण्यास मदत झाली.


शाळेचे मुख्याध्यापक एल. झेड. सुरजुसे यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपक्रम राबविण्यात आले. यावेळी आर. एस. देशमाने, आर. बी. अडोळे, सी. एल. गाडेकर, एस. के. पवार, एस. जी. पवार, जगदीश बनसोड, भावेश काळे, रामेश्वर चव्हाण, दत्ता चव्हाण आणि पी. आर. शिंदे यांच्यासह शाळेतील सर्व कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

0 Response to "सेवा संकल्प अभियानातून तुळजापूर निवासी शाळेत आरोग्य, स्वच्छता व व्यसनमुक्तीचा जागर"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article