
अतिवृष्टीमुळे रिसोड तालुक्यातील शेतकऱ्यावर ओढवले अस्मानी संकट
साप्ताहिक सागर आदित्य
अतिवृष्टीमुळे रिसोड तालुक्यातील शेतकऱ्यावर ओढवले अस्मानी संकट
राज्यात यंदा खूप मोठ्या प्रमाणात ढगफुटी आणि अतिवृष्टीमुळे सर्वत्र हाहाकार माजला असून आज रोजी सर्वत्र पावसाचे महा संकट उद्भवले असून प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेत जमिनीतील पिके एकतर खरडून गेली आहेत किंवा आहे ते पीक निकृष्ट झाले आहे. या पावसामुळे अनेक खेड्यात घरात पाणी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तरी देखील प्रजन्य राजा शांत होत नाही. 26 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर पासून पुढील पाच दिवस आपल्या परिसरासह सर्वत्र भयंकर पाऊस होण्याची दाट शक्यता हवामान वेधशाळेने वर्तवली आहे. यातच रिसोड तालुक्यातून सतत तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस झाला असून पैनगंगा, कांच, उतावळी त्या नद्यासह नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आल्यामुळे व नाले ओसंडून वाहत आहेत. या पुरांमुळे सरपखेड धोडप करडा गोभणी मार्ग बंद झाला आहे. 30 सप्टेंबर पर्यंत परिसरातील लोकांनी सतर्क रहावे असा इशारा व सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.
0 Response to "अतिवृष्टीमुळे रिसोड तालुक्यातील शेतकऱ्यावर ओढवले अस्मानी संकट "
Post a Comment