
आदिवासी बहुल भागातील नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ वितरण
साप्ताहिक सागर आदित्य
सेवा पंधरवडामध्ये सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचुया
ब्रिजेश पाटील
आदिवासी बहुल भागातील नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ वितरण
वाशिम, आदिवासी व सर्वसामान्य नागरिकांच्या दारी शासनाचे लाभ पोहोचविण्याच्या उद्देशाने जिल्ह्यात सेवा पंधरवडा उपक्रमांतर्गत विविध शिबिरांचे आयोजन होत असून नागरिकांच्या समस्या ऐकून त्यांचे तात्काळ निराकरण करण्याकडे प्रशासन लक्ष केंद्रीत करत आहे.सेवा पंधरवडामध्ये सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचुया असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सुरू असलेल्या सेवा पंधरवडा व आदिसेतु उपक्रमाच्या अनुषंगाने रिसोड तालुक्यातील आगरवाडी, कंकरवाडी, चिचांबाभर, कुऱ्हा व मांगवाडी या आदिवासी बहुल गावांमध्ये महसूल प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच उपलब्ध सुविधांचा आढावा घेतला.
यानंतर आगरवाडी येथे आयोजित शिबिरात अप्पर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, महसूल उपजिल्हाधिकारी विरेंद्र जाधव, ,तहसीलदार रिसोड प्रतीक्षा तेजनकर , गटविकास अधिकारी खुळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
तहसीलदार रिसोड प्रतीक्षा तेजनकर यांनी केले. त्यांनी आदिसेतु उपक्रमाचा उद्देश व नागरिकांना मिळणारे शासकीय योजना व लाभ स्पष्ट केले. शाळा, आश्रमशाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालय तसेच ग्रामविकास विषयक मूलभूत सोयी-सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली. विद्यार्थ्यांचे आरोग्य, निवास व्यवस्था, शैक्षणिक गुणवत्ता, स्वस्त धान्य दुकान, सांडपाणी व रस्ते व्यवस्था, दिवाबत्ती आदी विषयक बाबींवर चर्चा होऊन तात्काळ उपाययोजना करण्यासंबंधी मार्गदर्शन करण्यात आले.
महसूल उपजिल्हाधिकारी श्री जाधव यांनी ई-पीक पाहणी व पाणंद रस्त्याविषयी मार्गदर्शन केले.
उपविभागीय अधिकारी श्रीमती देवकर यांनी ‘जिवंत सातबारा’, ६क व गावस्तरावरील महसूल विषयक अडचणींवर माहिती दिली.गटविकास अधिकारी खुळे यांनी प्रशासन सदैव जनतेच्या सेवेत तत्पर असल्याचे अधोरेखित केले.
शिबिरातील सेवा व लाभ वाटप:
७४ नागरिकांची बीपी व शुगर तपासणी,
८० नागरिकांची नेत्र तपासणी (समता फाउंडेशन तर्फे)
यापैकी १३ जणांना शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरविण्यात आले.
दाखले व कार्ड वाटप:
२५ आयुष्मान कार्ड,
१८ आधार कार्ड,
२ अॅग्रिस्टॅक नोंदी,
२ फार्मर आयडी,
नवीन ऑनलाईन राशनकार्ड,
१५ लाभार्थ्यांना सामाजिक सहाय्य योजनेअंतर्गत मंजुरी आदेश,
१३ विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र,
६ विद्यार्थ्यांना वय व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र,
आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना किट वाटप,
२ बचतगटांना धनादेश वितरण,
‘लखपती दीदी’ योजनेअंतर्गत लाभ
३ दापत्यांना बेबी किट वाट,
प्रॉपर्टी कार्ड व सनद वाटप करण्यात आले.
या शिबिराद्वारे आदिवासी जमातीच्या बांधवांना शासनाच्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ उपलब्ध झाला असून सेवा पंधरवडा व आदिसेतु उपक्रम अधिक प्रभावी व परिणामकारक ठरल्याचे अधोरेखित झाले.
कार्यक्रमास तालुक्यातील सर्व नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, महसूल सहाय्यक, महसूल सेवक, ग्रामसेवक, विविध विभाग प्रमुख, सरपंच, पत्रकार बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंडळ अधिकारी समाधान जावळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
0 Response to "आदिवासी बहुल भागातील नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ वितरण"
Post a Comment