मानोरा येथे रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न स्थानिक वसंतराव नाईक विद्यालय मानोरा येथे रक्षाबंधन दिनाचे औचित्य साधून शाळेतील विद्यार्थी तथा विद्यार्थीनी यांनी रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन
साप्ताहिक सागर आदित्य
मानोरा येथे रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न स्थानिक वसंतराव नाईक विद्यालय मानोरा येथे रक्षाबंधन दिनाचे औचित्य साधून शाळेतील विद्यार्थी तथा विद्यार्थीनी यांनी रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असता कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी शाळेचे मुख्याध्यापक प्रसेन भगत होते तर ईयता पाचवी ते दहावीच्या मुलींनी आपल्या वर्गातील मुलांना भाऊ मानुन राखी बांधूनओवाळनी केली आणि मुलांनी सुद्धा बहिणीच्या राखीचा आनंदाने स्वीकार करून, रक्षण करण्यासाठी राखीच्या बंधन धाग्याला महत्व जपण्यासाठी, व बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारली, अतिशय महत्त्वाचा असलेला हा बहिण भावाच्या पवित्र नाते जपणारा हा सन शाळेत अतिशय आनंदाने साजरा करण्यात आला तर मुलांनी बहिणीच्या राखीची परत फेड म्हणुन सर्वांनी चॉकलेट, व काही पैसे स्वरुपात लहानशी भेट दिली यावेळी शाळेच्या मुलांनी आपले विचार व्यक्त केले तर काही मुलींनी रक्षाबंधन सामुहिक गीत सादर केले कार्यक्रमाचे शेवटी सर्व विद्यार्थी यांना केळी वाटप केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंचल नेमीचंद चव्हाण यांनी तर आभार साक्षी राठोड यांनी केले रक्षाबंधन कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक अनंत खडसे, सरोज सोळंके, विजयश्री सरनाईक, सविता भालेराव, वैशाली चातुरकर, तेजस्विनी इंगळे, ज्योती इंगोले, चंद्रशेखर वानखडे, विकलसींग राठोड, निलेश उजवे, गौतम भगत, सुरेश पारधी, उपस्थित होते
0 Response to "मानोरा येथे रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न स्थानिक वसंतराव नाईक विद्यालय मानोरा येथे रक्षाबंधन दिनाचे औचित्य साधून शाळेतील विद्यार्थी तथा विद्यार्थीनी यांनी रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन"
Post a Comment