-->

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृति समिती     अंगणवाडी कर्मचारी भगिनींनो,

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृति समिती अंगणवाडी कर्मचारी भगिनींनो,

 


साप्ताहिक सागर आदित्य 

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृति समिती

 अंगणवाडी कर्मचारी भगिनींनो,

आज दिनांक २५ जानेवारी २०२४, रोजी अंगणवाडी कर्मचारी कृति समितीच्या नेत्यांची  सचिव, महिला व बालविकास, अनुपकुमार यादव आणि महिला बाल विकास आयुक्त  रुबल अग्रवाल व अन्य आधिकाऱ्यांसोबत विस्तृत मीटिंग झाली.

    

१) शासनाने अंगणवाडी    कर्मचाऱ्यांच्या साठी पेंशन योजनेचा अंतिम  प्रस्ताव तातडीने  तयार करण्याचे मान्य केले असून लवकरात लवकर प्रस्ताव  मंत्रीमंडळात  मंजुरीसाठी पाठवला जाईल असे सांगितले. तसेच कृति समितीच्या वतीने पेंशन योजने बाबत ठोस  सुधारणांचा लेखी प्रस्ताव देण्यात आला.


२) सर्वोच्च न्यायालयाच्या  निर्णयाप्रमाणे ग्रॅच्युईटी देण्याचे मान्य केलें.


 ३) मोबाइल  तात्काळ  देणार.

        

४) मिनी अंगणवाडी सेविकांना पूर्ण अंगणवाडी सेविका पदाचे आदेश त्वरित देणार. 

      

५) संपकाळात कामावरून कमी केलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर घेण्याचे मान्य केले. तसेच सर्व कारवाई आदेश मागे घेणार. असे मान्य केले

         

६)  संप काळ करोना काळातील राहिलेल्या  दिवाळी व उन्हाळी  सुट्टी मध्ये समायोजित करण्याविषयी सकारात्मक विचार करणार.


७) १०वी पास मदतनिसांना सेविका पदी थेट नियुक्ती देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. 


 वरील सर्व चर्चा सचिव आणि आयुक्त यांच्याशी झाली. कृती समितीला ही चर्चा  आशा दायक वाटली. त्याचप्रमाणे महिला बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी  दिनांक ५/१२/२०२३ रोजी झालेल्या मीटिंग मधे  दिलेल्या  आश्वासनाप्रमाणे आशा सेविकांच्या मानधन वाढीचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत  आल्या नंतर त्याचें अवलोकन करुन अंगणवाडीच्या कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढीचा विषय मंत्री मंडळात मांडण्यात येईल.

        

वरील परिस्थिती व शासनाच्या सकारात्मक भूमिके मुळे तसेच ग्रॅच्युइटी व पेन्शनचा महत्वाचा   निर्णय होत असल्याने अंगणवाडी कर्मचारी कृति समिति आपला संप मागे घेत आहे. आजच्या बैठकीला एम. ए. पाटील, ॲड. निशा शिवूरकर, शुभा शमीम , दिलीप उटाणे, दत्ता देशमुख, सुवर्णा तळेकर, आप्पा पाटील, आरमायटी इराणी, ॲड. माधुरी क्षीरसागर हे कृति समितीचे सदस्य उपस्थित होते.

       

तरी उद्या २६ जानेवारी  रोजी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी कार्यक्रमात सहभागी होवून काम सुरु करावे. आपले संविधान मजबूत करुयात.

      

अंगणवाडी  कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या एकजूट आणि  संघर्षामुळे आपल्या महत्वाच्या मागण्या मान्य होत आहेत. तुम्हा  सगळ्यांचे अभिनंदन! मानधनवाढीबाबत लवकरच निर्णय होईल अशी अपेक्षा करुया.  

              

        

दिलीप उटाणे      राज्य अध्यक्ष

सविता इंगळे जिल्हा अध्यक्ष

डिंगाबर अंभोरे कार्याध्यक्ष

मालती राठोड जिल्हा सचिव

सीता खिल्लारे सहसचिव

मंगला घुगे तालुका अध्यक्ष

शीला कंकाळ तालुका सचिव

अंजू वानखडे तालुका अध्यक्ष

नंदा वैद्य उपाध्यक्ष

सरला जाधव तालुका सचिव

ज्योती देशमुख तालुका अध्यक्ष

सविता ऊईके तालुका सचिव

मायावती डोंगरे तालुका अध्यक्ष

संगीता नवघन तालुका सचिव

संगीता कांबळे

अनिता इंगोले

पांडे ताई


 किरणताई पडघान

सोनल ढोबळे

कांता मोरे

पार्वती रोकडे

0 Response to "महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृति समिती अंगणवाडी कर्मचारी भगिनींनो,"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article