-->

विशेष सहाय्य योजना  पात्र लाभार्थ्यांना राज्य पुरस्कृत योजनेच्या अनुदानाचे वितरण

विशेष सहाय्य योजना पात्र लाभार्थ्यांना राज्य पुरस्कृत योजनेच्या अनुदानाचे वितरण

 


साप्ताहिक सागर आदित्य 

विशेष सहाय्य योजना

पात्र लाभार्थ्यांना राज्य पुरस्कृत योजनेच्या अनुदानाचे वितरण 


वाशिम  राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांचे जुलै ते सप्टेंबर 2023 या कालावधीतील अनुदान ऑक्टोबर 2023 मध्ये प्राप्त झाले.प्राप्त झालेले अनुदान जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम यांच्याकडून सर्व तहसील कार्यालयांना लाभार्थी संख्येनुसार व त्यांनी केलेल्या मागणीनुसार वितरित करण्यात आले.

                केंद्र पुरस्कृत योजनेसाठी अद्यापही अनुदान प्राप्त झालेले नाही.अनुदान प्राप्त होताच त्याचे वितरण करण्यात येणार आहे.

            राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्वसाधारण 21 हजार 603 लाभार्थ्यांना,संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अनुसूचित जातीच्या 7382 लाभार्थ्यांना सप्टेंबर 2023 पर्यंतचे,संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अनुसूचित जमातीच्या 1934 लाभार्थ्यांना ऑगस्टपर्यंतचे,श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेच्या 35 हजार 7 सर्वसाधारण लाभार्थ्यांना सप्टेंबरपर्यंतचे,श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या अनुसूचित जातीच्या 12 हजार 77 लाभार्थ्यांना सप्टेंबरपर्यंतचे, श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजना अनुसूचित जमातीच्या 2166 लाभार्थ्यांना सप्टेंबरपर्यंतचे अनुदान वाटप करण्यात आले आहे.जिल्ह्यात  केंद्र व राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत 95 हजार 942 लाभार्थी असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांनी दिली.

0 Response to "विशेष सहाय्य योजना पात्र लाभार्थ्यांना राज्य पुरस्कृत योजनेच्या अनुदानाचे वितरण "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article