-->

मॅट्रीकपुर्व शिष्यवृत्ती योजना  गुगल फॉर्मवर तात्काळ माहिती भरा  समाज कल्याण विभागाचे आवाहन

मॅट्रीकपुर्व शिष्यवृत्ती योजना गुगल फॉर्मवर तात्काळ माहिती भरा समाज कल्याण विभागाचे आवाहन

 


साप्ताहिक सागर आदित्य 

मॅट्रीकपुर्व शिष्यवृत्ती योजना

गुगल फॉर्मवर तात्काळ माहिती भरा

समाज कल्याण विभागाचे आवाहन


       वाशिम,  : अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचे शाळेतील गळतीचे प्रमाण कमी व्हावे. या उद्देशाने केंद्र शासनाने १ जुलै २०१२ पासुन इयत्ता ९ वी व १० वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकरीता भारत सरकार मॅट्रीकपुर्व शिष्यवृत्ती योजना सुरु केली आहे. ही योजना केंद्र पुरस्कृत असल्याने केंद्र शासनाच्या वतीने ही योजना ऑनलाईन करण्यात आली आहे. याकरीता जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, वाशिम या कार्यालयाच्या वतीने ऑनलाईन गुगल फॉर्म तयार करुन देण्याल आला आहे. सन 2022-23 या वर्षात प्रवेशित अर्ज केलेल्या प्रत्येक मुलांची माहिती गुगल फॉर्मवर भरणे आवश्यक आहे.


           ही योजना शासकीय मान्यता प्राप्त शाळेत शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यास लागू राहील. शिष्यवृत्तीसाठी पालकांच्या उत्पन्नाची मर्यादा २ लक्ष रुपये आहे. विद्यार्थ्याच्या किमान गुणांची अट नाही. योजनेच्या लाभासाठी विद्यार्थ्यानी अर्ज करणे आवश्यक आहे. योजनेचा लाभ केंद्राच्या ईतर माध्यमिक पुर्व शिष्यवृत्तीच्या लाभार्थ्यांना लागू राहणार नाही.


           तरी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी (माध्यमिक) सन 2022-23 या वर्षात प्रत्यक्षात प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज या योजनेकरीता गुगल फॉर्मवर माहिती भरणे आवश्यक आहे. याबाबतची माहिती दोन दिवसाच्या आत तात्काळ भरण्यात यावी. जेणेकरुन मागासवर्गीय विद्यार्थी या योजनेपासुन वंचित राहणार नाही. असे जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी मारोती वाठ यांनी कळविले आहे.



Related Posts

0 Response to "मॅट्रीकपुर्व शिष्यवृत्ती योजना गुगल फॉर्मवर तात्काळ माहिती भरा समाज कल्याण विभागाचे आवाहन"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article