
सेवानिवृती निमित्त टि.जी.महाले यांचा सत्कार
साप्ताहिक सागर आदित्य
सेवानिवृती निमित्त टि.जी.महाले यांचा सत्कार
वाशिमः ग्रामसेवक टि.जी.महाले यांचा सेवा निवृत्ती निमित्त महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनीयन तालुका शाखा वाशिम च्या वतीने पंचायत समिती सभागृहात सत्कार करण्यात आला.
टि.जी.महाले 30 सप्टेंबर रोजी सेवा निवृत होत आहेत. त्यांनी नागपुर जिल्ह्यात ग्रामसेवक म्हणुन उत्कृष्ट सेवा बजावल्यानंतर वाशिम स्वजिल्ह्यात बदली घेतली. त्यांनी मंगरुळ व वाशिम पंचायत समिती अंर्तगत अनेक ग्रामपंचायत मध्ये चांगल्याप्रकारे कामकाज केले त्यांच्या कार्यकाळात ग्रामपंचायतला विविध पुरस्कार मिळवुन देण्यात यशस्वी पुढाकार घेतला. संगणकीय कामात त्यांचा हातखंडा असल्याने गेल्या काही वर्षापासुन ते जिल्हा परिषद पंचायत विभागात कार्यरत होते. तेथेही त्यांनी अनेक किचकट प्रकरणे व्यवस्थित हाताळलेत. सर्व ग्रामसेवक संवर्गाला सातत्याने मार्गदर्शन करत असतात.
गंगासागर महाले ग्रामसेवक युनीयन तालुका यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडलेल्या सत्कार सभारंभ कार्यक्रमास उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत दिंगबर लोखंडे आणि रिसोड गट विकास अधिकारी उदय जाधव तसेच प्रफुल्ल तोटेवाड गट विकास अधिकारी कारंजा व वाशिम यांची प्रमुख उपस्थिती होती. ग्रामसेवक टि.जी.महाले यांचे कार्य व सहकार्याच्या भुमिकेचे कौतुक करुन प्रशासनाला मदत केल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी लोखंडे यांनी आवर्जून सांगीतले. यावेळी उदय जाधव (रिसोड गविअ), प्रफुल्ल तोटेवाड (गट विकास अधिकारी कारंजा व वाशिम), प्रभारी विस्तार अधिकारी (पंचायत) डी.डी.राठोड, अनसिंग ग्राम विकास अधिकारी एस झेड बरेटीया आणि टनका ग्रामसेवक अरविंद पडघन यांनी आपले मनोगत व्यक्त केले व स्वअनुभव सांगितलेत.आणि सेवा निवृत्ती नंतरचे आयुष्य सुखी, समाधानी व आरोग्यसंपन्न दिर्घायुष्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. एखाद्या ग्रामसेवक यांच्या सेवा निवृत्ती सत्कार समारंभ कार्यक्रमास उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पं.) आणि दोन गट विकास अधिकारी हजर राहुन शुभेच्छा देणे खुप मोठी गोष्ट आहे.
गंगासागर महाले यांनी अध्यक्षीय मनोगतातुन महाले यांच्या शांत, संयमी स्वभावाचे व अभ्यापणाचे पैलु उलघडलेत. ग्रामसेवक युनीयनच्या वतीने टि.जी.महाले यांना भेटवस्तु देऊन सपत्नीक सत्कार केला. यावेळी विस्तार अधिकारी प्रमोद लोखंडे, टि.जी.महाले यांचे जेष्ठ बंधु डाॕ.पांडुरंग महाले आणि त्यांची मुलगी व जवाई सुध्दा उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट सुत्र संचालन ग्रामसेवक संजय नवघरे यांनी केले तर ज्ञानेश भांडारकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका सचिव सुरेखा इढोळे, उपाध्यक्ष अलका खंगार, हर्षा गांवडे, कार्याध्यक्ष जयश्री मस्के, कोषाध्यक्ष अष्टशिला जाधव आणि माजी तालुका अध्यक्ष गणेश ईढोळे यांचे सह सर्व इतर पदाधिकारी तसेच ग्रामसेवक मंडळी यांनी सहकार्य केले.
0 Response to "सेवानिवृती निमित्त टि.जी.महाले यांचा सत्कार"
Post a Comment