-->

महात्मा फुले महामंडळाच्या कर्ज व शैक्षणिक कर्ज योजना  लाभ घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

महात्मा फुले महामंडळाच्या कर्ज व शैक्षणिक कर्ज योजना लाभ घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

 


साप्ताहिक सागर आदित्य 

महात्मा फुले महामंडळाच्या कर्ज व शैक्षणिक कर्ज योजना

लाभ घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन


       वाशिम,  :  महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या वतीने जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींकरीता कर्ज सहाय्यक उपकरणे ही योजना राबविण्यात येते. ४० टक्केपेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेल्या पात्र व्यक्तींकरीता पुढील योजना या महामंडळाच्या वतीने कार्यान्वीत करण्यात आल्या आहे.

          दिव्यांग स्वावलंबन कर्ज योजना - राष्ट्रीय दिव्यांग वित्त व विकास महामंडळ, फरीदाबाद यांच्या वतीने दिव्यांग व्यक्तींकरीता दिव्यांग स्वावलंबन कर्ज योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत विविध लघु उद्योगाकरीता ५० हजार रुपये ते ५ लक्ष रुपये अर्थसहाय्य वार्षिक व्याजदर ५ टक्के ते ९ टक्के दराने महामंडळाच्या वतीने कर्ज उपलब्ध करून देण्यात येते.

          वैयक्तिक थेट कर्ज योजना - या महामंडळाच्या वतीने ५० हजार रुपयापर्यंत कुटीर उद्योगाकरीता वैयक्तीक थेट कर्ज योजना राबविण्यात येते. यासाठी २ टक्के वार्षिक व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्यात येते.

          महाशरद वेब पोर्टल - दिव्यांग व्यक्तींना विनामूल्य सहाय्यक साधने व उपकरणे उपलब्ध करून देण्यासाठी दिव्यांग आयुक्तालय, पुणे व महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या वतीने महाशरद वेबपोर्टल कार्यरत आहे. या पोर्टलवर इच्छुक दिव्यांग व्यक्तींनी सहाय्यक साधने व उपकरणाकरीता नोंदणी केल्यास महामंडळामार्फत सहाय्य उपलब्ध करून देण्यात येते. याकरीता www.mahasharad.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा. दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या वरील दोन्ही कर्ज योजना ऑफलाईन पद्धतीने राबविण्यात येत असल्यामुळे याविषयी महामंडळाचे जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, नालंदानगर, वाशिम येथे संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी केले आहे.



Related Posts

0 Response to "महात्मा फुले महामंडळाच्या कर्ज व शैक्षणिक कर्ज योजना लाभ घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article