
ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाची जिल्हा कार्यकारणी गठीत
साप्ताहिक सागर आदित्य
ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाची जिल्हा कार्यकारणी गठीत
जिल्हाध्यक्ष पदी संभाजीराव साळसुंदर तर महासचिव पदी गजानन उगले यांची निवड
वाशीम : येथील सिव्हिल लाईन स्थित अतिथी गृहामध्ये ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाची सहविचार सभा नुकतीच संघटनेचे महासचिव राम वाडीभष्मे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. वाशीम जिल्हा प्रभारी केशव गिऱ्हे, विजय शिंदे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी बोलतांना राम वाडीभष्मे म्हणाले की, ओबीसीच्या तळागाळातील लोकांपर्यंत आम्ही या संघटेनच्या माध्यमातून पोहचणार असून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील आहोत. तसेच संपूर्ण स्तरावरील ओबीसी अधिकारी कर्मचारी यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध आहोत, अशा विश्वास त्यांनी यावेळी दिला. तसेच संघटनेची ध्येय धोरणे, कार्यपद्धती व संघटनेचा इतिहास याविषयी सविस्तर माहिती दिली.
देशात बहुसंख्य असलेला ओबीसी समाज हा अनेक जातीत विखुरलेला असल्याने त्यांच्या समस्येकडे दुर्लक्ष केल्या जाते. कर्मचारी हा समाज आणि प्रशासन यामधील दुवा असल्याने त्यांचे संघटन महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन वाशीम जिल्हा प्रभारी केशव गिऱ्हे यांनी केले.
ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ हे ओबीसी अधिकारी कर्मचारी वेलफेअर असोशियशन र. नं.३०५ अंतर्गत केंद्रीय तथा राज्य शासकीय, निम शासकीय, खाजगी क्षेत्रातील अधिकारी कर्मचारी यांचे गैर - राजनीतिक संघटन आहे. संघटनेची स्थापना २०१८ झाली असून विखुरलेल्या सर्व ओबीसी अधिकारी कर्मचारी यांना एकत्र आणून संविधानात अंतर्भूत असलेली स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता ही तत्त्वे प्रत्यक्षात आणणे हा संघटनेचा मुख्य उद्देश आहे. तसेच जातीनिहाय जनगणना, नॉन क्रिमी लेअरची असंविधानिक अट रद्द करणे, पदोन्नतीमध्ये आरक्षण मिळणे यासाठी संघटनात्मक प्रयत्न सुरू आहेत.
यावेळी सर्वानुमते वाशीम जिल्हाध्यक्ष पदी संभाजी साळसुंदर यांची निवड करण्यात आली. महासचिव पदी गजानन उगले, कार्याध्यक्ष पदी शत्रुघ्न गवळी, संपर्क प्रमुख पदी नवनाथ मुसळे, संघटक पदी भागवत मोहिरे, प्रसिद्धी प्रमुख पदी अनिल बळी, महिला प्रतिनिधी म्हणून संगीता काकडे तर उपाध्यक्ष पदी श्रीकांत बोरचाटे यांची निवड करण्यात आली. सर्वांचे नियुक्ती पत्र देऊन स्वागत आणि सत्कार करण्यात आले.
सभेचे संचलन अनिल बळी यांनी केले तर आभार समाधान गिऱ्हे यांनी मानले
यावेळी गजानन उगले,पांडुरंग साळसुंदर,किसन साळसुंदर,नवनाथ मुसळे, भागवत मोहीरे,श्रीकांत बोरचाटे,संजीव नागुलकर,समाधान गीऱ्हे,शिवाजी वानखेडे,अनिल बळी,संभाजी साळसुंदर,शत्रुघ्न गवळी,संगीता काकडे मॅडम यासह बहुसंख्य कर्मचारी उपस्थित होते.
0 Response to "ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाची जिल्हा कार्यकारणी गठीत"
Post a Comment