-->

तुळसी विवाहास प्रारंभ..

तुळसी विवाहास प्रारंभ..


साप्ताहिक सागर आदित्य/

तुळसी विवाहास प्रारंभ.. 

वाशिम - हिंदू संस्कृतीमध्ये तुळशी विवाहाला अन्य साधारण महत्व आहे . कार्तिक शुद्ध द्वादशीला तुळशीच्या विवाहाला सुरुवात होते . यंदा शनिवार ५ नोव्हेंबर पासून सुरुवात होणार आहे . ९ नोव्हेंबरला तुळशी विवाहाची समाप्ती होणार आहे . तुळशी विवाह साठी शहरात विविध चौकात आवळा , बोर , पूजा साहित्य विक्रीस आले आहे . तसेच आकर्षक तुळशी वृंदावना सही मागणी आहे . तुळशी विवाहासाठी बोर भाजी , आवळा , फुले कवठ , करंडा , बांगड्या , फनी , पोत , आरसा , असे ओटीचे साहित्य शहरात उपलब्ध आहे . हे साहित्य खरेदी करण्यासाठी महिलांची लगबग सुरू आहे . तुळशी विवाहाचा उत्सव मात्र दांडगा असून लग्न लग्नसराईची ही सुरुवात उत्साहहवर्धक दिसून येत आहे . तुळशी विवाह आणि देवूठाणी एकादशीला मंदिर आणि घरामध्ये पूजा केली जाईल . प्रत्येक घरात तुळशी विवाह सोहळा पार पडणार आहे . भगवान | विष्णूच्या शालिग्राम चा विवाह तुळशी सोबत होणार आहे . उसाचा मंडप सजवून विवाह सोहळ्याची परंपरा पाळली जाणार आहे . तुळशी विवाहाला सनातन धर्मात खूप महत्त्व आहे . या दिवशी विष्णू स्वरूप शालिग्राम आणि तुळशीचा विवाह होतो . चार वर्षांपूर्वी आषाढ शुल्क एकादशीला म्हणजेच देवशयनी एकादशीला देवतांना विसावण्याची परंपरा होती . परंतु काही जण एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत तुळशीची पूजा करतात व पाचव्या दिवशी तुळशी विवाह करतात . तुळशीचा विवाह देवाशी म्हणजेच विष्णूशी लावला जातो . तुळशी विवाह करण्याची प्रथा पुरातन काळापासून आहे . काही ठिकाणी तुळशीची गौरी प्रमाणे पूजा करतात . मंगळसूत्र , चांदीची जोडवी , खणा नारळाची ओटी भरतात . तुळशीला नैवेद्यासाठी गोड पदार्थ घराण्याच्या परंपरेनुसार केले जातात . शिवाय फळे , बताशी , मुरमुरे , खजूर , खडीसाखर आधी प्रसाद विवाह नंतर वाटला जातो . तुळशी विवाह साठी उसाचा मंडपही केला जातो . परिसरातील नागरिक , नातेवाईक आणि कुटुंबातील सर्व सदस्य या तुळशी विवाह आनंदाने सहभागी होतात .

Related Posts

0 Response to "तुळसी विवाहास प्रारंभ.. "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article