महाविकास आघाडीने जनतेचा अंत न पहाता त्वरीत शासकिय निमशासकिय समित्यांचे गठण करण्याची समाजसेवक संजय कडोळे यांची मागणी
साप्ताहिक सागर आदित्य/
महाविकास आघाडीने जनतेचा अंत न पहाता त्वरीत शासकिय निमशासकिय समित्यांचे गठण करण्याची समाजसेवक संजय कडोळे यांची मागणी
कारंजा (लाड) - सरकार स्थापन होऊन जवळ जवळ अडीच वर्षे झाली तरीसुद्धा महाविकास आघाडी शासनाने, जिल्ह्यातील शासकिय निमशासकिय समित्यांचे गठनच केले नसल्यामुळे, सर्वसामान्यांच्या हिताच्या सर्वच योजना खोळंबलेल्या असून, विविध विकास कामांना अडचणी येत आहेत . त्यामुळे आता जनतेचा अंत न बघता काँग्रेस - राष्ट्रवादी - शिवसेना पक्षाने लवकरात लवकर सर्वच समित्यांचे गठन करण्याची मागणी, विदर्भ लोककलावंत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि जिल्हयातील महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त समाजसेवक संजय कडोळे यांनी, काँग्रेसचे युवा आमदार अमित झनक यांना आपले संभाषणातून प्रत्यक्ष भेटीदरम्यान केली आहे . यावेळी त्यांचेसोबत विदर्भ लोककलावंत संघटनेचे नंदकिशोर कव्हळ्कर होते . तसेच यावेळी कारंजा येथील माजी नगराध्यक्ष अरविंद लाठीया, दिलीप भोजराज, एड . संदेश जिंतुरकर, राजीक शेख, रामबकस डेंडूळे, प्रदिप वानखडे इ ची उपस्थिती होती . यावेळी आपल्या संभाषणातून आमदार अमित झनक यांनी "येत्या सात दिवसात सर्व शासकिय निमशासकिय समित्यांच्या गठनाचा प्रश्न हमखास निकाली निघणार . " असल्याचे विश्वासाने सांगीतले . राष्ट्रीय कॉंग्रेसच्या डिजीटल नोंदनी अभियाना करीता स्थानिक श्रीमती शंकुतलाबाई धाबेकर महाविद्यालयात मंगळवारी आमदार अमित झनक आले असतांना कलावंतानी त्यांचेकडे समिती स्थापना विषयी गळ घातली होती हे विशेष .
0 Response to "महाविकास आघाडीने जनतेचा अंत न पहाता त्वरीत शासकिय निमशासकिय समित्यांचे गठण करण्याची समाजसेवक संजय कडोळे यांची मागणी "
Post a Comment