साप्ताहिक सागर आदित्य/संपूर्ण वर्षभर राबवित आहे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव
तंत्रस्नेही शिक्षक शरद देशमुख यांचा अभिनव उपक्रम
वाशिम - केंद्र सरकारच्या कला व क्रीडा विभागाच्या आव्हानाला प्रतिसाद देत एक भारत श्रेष्ठ भारत तसेच अमृत महोत्सव स्वातंत्र्याचा हा उपक्रम सर्व शाळा-कॉलेज महाविद्यालयांमधून राबविण्यात येत आहे,
परंतु श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वाशिम चे तंत्रस्नेही शिक्षक शरद देशमुख यांनी या शासनकृत उपक्रमाची सुरुवात दि 15 ऑगस्ट 2021 ते 15 ऑगस्ट 2022 या संपूर्ण वर्षभराच्या कालखंडात दररोज न चुकता नावीन्यपूर्ण माहितीने व मनोरंजक पद्धतीने आपल्या ज्ञान यात्री तंत्रस्नेही या यूट्यूब चैनल च्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली. एक भारत श्रेष्ठ भारत या अंतर्गत महाराष्ट्र ओडीसा राज्याबरोबरच भारतातील संपूर्ण घटक राज्याची माहिती प्रश्नमंजुषा च्या माध्यमातून विद्यार्थ्यासाठी ज्ञानयात्री तंत्रस्नेही या वेबसाईटवर केली तसेच महाराष्ट्रातील 36 जिल्ह्याची माहिती सुद्धा प्रश्नमंजुषेच्या उपक्रमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली, तिसऱ्या सत्रात गाथा बलिदानाची भारताच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणार्या ज्ञान-विज्ञान शुरविराची प्रश्नमंजुषा च्या माध्यमातून ओळख करून दिली. चौथ्या सत्रात लोकशाहीचे आधारस्तंभ कायदेमंडळ कार्यकारी मंडळ न्यायमंडळ स्वायत्त संस्था समाज माध्यमे पत्रकारिता यांची ओळख पाचव्या सत्रात बेटी बचाव बेटी पढाव, पडेगा भारत तभी तो बडे का भारत, तंत्रज्ञान विषयक मोफत कार्यशाळा जसे यूट्यूब चैनल,वेबसाईट निर्मिती, इत्यादी संपूर्ण वर्षभर एकही दिवस न चुकता स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव उत्सवात साजरा केला जात आहे, त्यामुळे सर्व ज्ञानवंतांनी या उपक्रमात सहभागी होऊन स्वातंत्र्याच्या यज्ञ कुंडातील स्वातंत्र्य वीरांची ओळख करून आपले योगदान द्यावे, असे आवाहन ज्ञानयात्री तंत्रस्नेही शिक्षक शरद देशमुख यांनी केले.




0 Response to "संपूर्ण वर्षभर राबवित आहे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव तंत्रस्नेही शिक्षक शरद देशमुख यांचा अभिनव उपक्रम"
Post a Comment