-->

युवकांनी शेतीचे आधुनिक तंत्राचा अवलंब करून कृषी क्षेत्रात क्रांती घडवावी-माजी मंत्री अनंतराव देशमुख

युवकांनी शेतीचे आधुनिक तंत्राचा अवलंब करून कृषी क्षेत्रात क्रांती घडवावी-माजी मंत्री अनंतराव देशमुख


साप्ताहिक सागर आदित्य/

युवकांनी शेतीचे आधुनिक तंत्राचा अवलंब करून कृषी क्षेत्रात क्रांती घडवावी-माजी मंत्री अनंतराव देशमुख

शास्त्रोक्त संत्रा लागवड व सुधारीत एकात्मीक अन्नद्रव्य व्यवस्थापन या विषयावर संत्रा शेती दिन तसेच चर्चा सत्र व शिवार फेरी संपन्न

वाशिम - कृविकेच्या पुढाकाराने वडजी येथिल गट समुह शेती माध्यमातुन आयोजन

कृषी विज्ञान केंद्र, करडा यांच्या वतीने सलग तीन वर्षा पासुन दत्तक ग्राम वडजी मध्ये 95 संत्रा उत्पादक शेतक-यांचा समुह गट शेतीला चालना दिली जात असुन प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेला संत्रा उत्पादक शेतक-यांच्या शेतावर गट चर्चा व शिवार फेरी आयोजीत केली जाते. या नाविन्यपुर्ण व शेतकरी बांधवांच्या पसंतीला आलेल्या या उपक्रमांव्दारे दिनांक 18 जानेवारी २०२२ रोजी ग्राम वडजी येथे “शास्त्रोक्त संत्रा लागवड व सुधारीत एकात्मीक अन्नद्रव्य व्यवस्थापन” या विषयावर संत्रा शेती दिन तसेच चर्चा सत्र व शिवार फेरी घेण्यात आली.

कर्यक्रमाच्या अध्यक्षस्थान माजी खा. तथा अध्यक्ष सुविदे फाउंडेशन रिसोड अनंतराव देशमुख यांनी भुषविले तर उदघाटक म्हणुन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विदयापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. राजेंद्र गाडे उपस्थीत होते. विशेष अतिथी म्हणुन वाशिम जिल्हा परीषदचे महिला व बालकल्याण सभापती सिदधार्थ देवरे, जिवाग्रोचे विभागीय व्यवस्थापक जि.के.भगत तर प्रमुख अतिथी मध्ये कृविकेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. आर.एल.काळे, कृषी उपसंचालक निलेश ठोंबरे, अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प लिंबुवर्गीय फळे पंदेकृवि अकोला डॉ.योगेश इंगळे, कृविकेचे शास्त्रज्ञ एस.के.देशमुख, डॉ.डि.एन.इंगोले आदी मान्यवरांची उपस्थीती लाभली.

अध्यक्षस्थानावरुन संबोधतांना  माजी खा. अनंतराव देशमुख यांनी समुह गट शेतीच्या माध्यमातुन ग्रामिण युवकांनी आदर्श संत्रा बागा उभ्या केल्या बददल तरुन वर्गाचे अभिनंदन करुन खंबीरपने कृषी विज्ञान केंद्राचा तांत्रिक सहकार्य नियमित देवु असे आश्वासित केले. यापुढे बोलतांना त्यांनी बागांपासुन मिळणा-या उत्पन्नाचा जास्त दर मिळावा या हेतुने शित गृह उभारणे तसेच निर्यातक्षम शेतीचा सुदधा नियोजन ठेवावे असे सुचविले. नवनविन प्रयोगामध्ये त्यांनी शेतकरी उत्पादक कंपनी, गिर गाईचे संगोपन, समृदधी मार्गचा विचार सुदधा करावा असे आव्हान केले.

  विस्तार शिक्षण संचालक डॉ. राजेंद्र गाडे यांनी कृषी विज्ञान केंद्राव्दारे ग्राम स्तरावर आयोजित होणा-या उपक्रमांबददल समाधान व्यक्त करुन विदयापिठाच्या तांत्रिक सहकार्याचें आश्वासन दिले यावेळी उपस्थितांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमास संत्रा बागायतदार,वडजी व पंचक्रोशीतील शेतकरी युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 




0 Response to "युवकांनी शेतीचे आधुनिक तंत्राचा अवलंब करून कृषी क्षेत्रात क्रांती घडवावी-माजी मंत्री अनंतराव देशमुख"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article