-->

माहेश्वरी संघटनेचे जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षकांना निवेदन शिरपूर येथील हत्याकांडाची सखोल व निष्पक्षपणे चौकशी करा

माहेश्वरी संघटनेचे जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षकांना निवेदन शिरपूर येथील हत्याकांडाची सखोल व निष्पक्षपणे चौकशी करा


साप्ताहिक सागर आदित्य/

माहेश्वरी संघटनेचे जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षकांना निवेदन शिरपूर येथील हत्याकांडाची सखोल व निष्पक्षपणे चौकशी करा 

शिरपूर येथील हत्याकांडाची सखोल व निष्पक्षपणे चौकशी करा जिल्हाधिकारी 

वाशिम - जिल्ह्यातील शिरपूर जैन येथील धोंडूलाल मुंदडा यांचा मुलगा मुरलीधर मुंदडा वय 22 वर्षे याची त्याचा मित्र आरोपी श्रीकांत गोरे याने निर्घून हत्या केली असून, सदर प्रकरणाचा वरिष्ठ पातळीवरुन सखोल चौकशी करुन या हत्येमध्ये आणखी काही आरोपी सहभागी आहेत का? याची चौकशी करुन सर्वांना जेरबंद करुन मृतकाला न्याय देण्याची मागणी वाशिम जिल्हा माहेश्वरी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधिक्षक यांना 18 जानेवारी रोजी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.

सदर प्रकरण हे जलदगती न्यायालयात वर्ग करुन आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना वाशिम जिल्हा माहेश्वरी संघटनेचे अध्यक्ष शिवलाल भुतडा, सचिव कैलास मुंदडा, उपाध्यक्ष सुनिल गट्टाणी समवेत दामोदर सारडा, डॉ. माणिक धूत, निलेश सोमाणी, जुगलकिशोर मुरलीधर जोशी, अ‍ॅड. राजेश कासट, शैलेश सोमाणी, गोविंद जाजू, संजय सारडा, आशिष हुरकट, दिपक दागडीया आदी पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती.

सर्व प्रकरणाचा निष्पक्ष तपास होईल ः जि.पो.अ. बच्चनसिंह

यावेळी शिष्टमंडळाने जिल्हा पोलिस अधिक्षक बच्चन सिंह यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेवून निवेदन दिले. यावेळी शिष्टमंडळाशी चर्चा करताना बच्चन सिंह यांनी सांगितले की, या प्रकरणात एका आरोपीला अटक केलेली आहे. सोबतच संपर्ण प्रकरणाची चौकशी सुरु असून, या प्रकरणामध्ये सहभागी असलेला कुठलाही आरोपी सुटणार नाही. मृतकाला न्याय मिळेल असे सांगत लवकरच संपूर्ण प्रकरणाचा उलगडा जिल्हा पोलिस प्रशासन करणार असल्याचे सांगितले. संपूर्ण प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी व प्रक्रिया सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.




0 Response to "माहेश्वरी संघटनेचे जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षकांना निवेदन शिरपूर येथील हत्याकांडाची सखोल व निष्पक्षपणे चौकशी करा "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article