-->

राज्यातील शाळा लवकरच सुरू होणार , आदित्य ठाकरेंनी दिले संकेत

राज्यातील शाळा लवकरच सुरू होणार , आदित्य ठाकरेंनी दिले संकेत



साप्ताहिक सागर आदित्य/

राज्यातील शाळा लवकरच सुरू होणार , आदित्य ठाकरेंनी दिले संकेत

मुंबई - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यात दिवसाला मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या वाढत असताना राज्यातील शाळा १५ फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे . कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यात दिवसाला मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या वाढत असताना राज्यातील शाळा १५ फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे . पण आता शाळा सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे . राज्यातील शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला असल्याचं सांगितलं जात आहे . आता राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही शाळा पुन्हा सुरू होण्याचे संकेत दिले आहेत .

आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे . मुंबई महापालिका आणि कोविड टास्क फोर्ससोबत आदित्य ठाकरे यांची बैठक आज पार पडली . यात कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला तसंच शाळा सुरू करण्याबाबतच्या मुद्द्यावरही चर्चा झाली आहे . तसंच बैठकीत १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाबाबतचा आढावा घेण्यात आला .

काय म्हणाले आदित्य ठाकरे ?

 " मुंबई महापालिका आणि राज्याच्या कोविड टास्क फोर्ससोबत आज आढावा बैठक घेण्यात आली . यात १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या कोरोना विरोधी लसकरण तसंच शाळा पुन्हा सुरू करण्याबाबतची तयारीचा आढावा घेण्यात आला . आता रुग्णसंख्येत देखील घट होताना दिसत आहे " , असं ट्विट आदित्य ठाकरे यांनी केलं आहे .




0 Response to "राज्यातील शाळा लवकरच सुरू होणार , आदित्य ठाकरेंनी दिले संकेत"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article