सोमवारपासून राज्यातील शाळा सुरू होणार; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय...!
साप्ताहिक सागर आदित्य/
सोमवारपासून राज्यातील शाळा सुरू होणार; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय...!
मुंबई : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे बंद असलेल्या शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी दबाव वाढत असल्याने अखेर राज्य सरकारने सोमवारपासून सर्व शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे . याबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली . याबाबत शालेय शिक्षण विभागाने सर्व शाळा सुरू कराव्यात असा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला होता . त्यावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता दिली . त्यामुळे सोमवारपासून शाळा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे .
0 Response to "सोमवारपासून राज्यातील शाळा सुरू होणार; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय...!"
Post a Comment