केनवड ते कोयाळी रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम गावकऱ्यांकडून करण्यात आले बंद
साप्ताहिक सागर आदित्य/
केनवड ते कोयाळी रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम गावकऱ्यांकडून करण्यात आले बंद
केनवड - केनवड ते कोयाळी रस्त्याचे काम चालू आहे, या रस्त्याची साईड पट्टी काळी माती भरणे चालू आहे या रस्त्यावर बरीच गावची जाण्या-येण्याची वर्दळ चालू असते, शेतकऱ्यांचे शेतीचे काम चालू असते रात्री-बेरात्री जाण्या येण्याची प्रवास चालू असते बाजारपेठेची व शाळेचे काम रोज सुरू असते. या रस्त्यावर निकृष्ट दर्जाचा माल वापरून काम चालू आहे व साईड पट्टी मध्ये काळी माती वापरून काम सुरू आहे याकडे शासनाने तात्काळ लक्ष देणे गरजेचे आहे रस्त्याचे काम ठेकेदार कोणाच्या आशीर्वादाने करत आहे असे नागरिकांकडून म्हटले जात आहे. शासनाने याकडे लक्ष देऊन काळया मातीच्या जागी मुरूम वापरावा, अशी मागणी केली जात आहे. त्यामुळे कोयाळी बु. येथील गावकऱ्यांकडून रस्त्याचे काम बंद करण्यात आले.
0 Response to "केनवड ते कोयाळी रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम गावकऱ्यांकडून करण्यात आले बंद"
Post a Comment