-->

आघाडी आणि भाजप च्या कुरघोडयांमुळे शेतकरी देशोधडीला

आघाडी आणि भाजप च्या कुरघोडयांमुळे शेतकरी देशोधडीला


साप्ताहिक सागर आदित्य
/

आघाडी आणि भाजप च्या कुरघोडयांमुळे शेतकरी देशोधडीला
   राज्यातील शेतकरी दिवसेंदिवस विपन्नावस्थेत जात आसतांना राज्यातील सत्ताधीश आणि विरोधक राजकिय कुरघोडयात मग्न आहेत. गेल्या खरीप हंगामात अती पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड हाल झाले. सोयाबीन पीक अर्धे अधिक खराब झाले. तुटपुंजी मदत काही शेतकऱ्यांना देवुन सरकारने बोळवन केली. विमा कंपन्याकडुन पून्हा घोर निराशा झाली केवळ दहा ते बारा टक्केच शेतकऱ्यांना मदत देवुन कंपन्यानी हात वर केले. हया बाबतीत आढावा घेण्यासाठी सरकारकडे वेळच नाही. तुर पीक हातातून गेले. एकरी  एक पोते उत्पादन होत आहे. आशा परिस्थितीत शेतकऱ्यांचा लावलेला खर्च सुध्दा वसुल झाला नाही. त्यामुळे तुर पीकाला विमा मिळाला पाहिजे व सरकारने सुद्धा आशा कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करावी आसे पत्र राज्याचे मुख्यमंत्र्यांसह संबंधित विभागाला दिले आसल्याची माहीती भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांनी दिली आहे. गेल्या मार्च 2018 पासुन कोटेशन भरलेल्या शेतकऱ्यांना विज जोडणी नाही. वसुली साठी आटा पीटा करणारे काँग्रेस चे मंत्री ना.  नितीन राऊत यांनी याबाबत सुध्दा पुढाकार घेतला पाहेजे. जवळच्याच तेलंगणा सरकार ने शेतकऱ्यांना चोविस तास मोफत विज देण्याचे ठरवले. तर निवडणूक होवु घातलेलेल्या राज्यातील काँग्रेस सह सर्वच पक्षांनी शेतकऱ्यांना मोफत विज देण्याचे मान्य केले. मग महाराष्ट्रात आघाडी सरकार शेतकऱ्यांकडून सक्तीच्या वसुलीसाठी कनेक्शन कट करीत आहे याची जाण काँग्रेस ने ठेवली पाहिजे. अनेक शेतकरी कर्ज माफीपासून वंचित आहेत. तर नियमीत कर्ज भरणारांना पन्नास हजार देतो म्हणून मुग गिळून गप्प बसणार्या सरकार ला भूमिपुत्र जागे करणार आसल्याचे प्रसिद्धी पत्रात म्हटले आहे. काही ठिकाणी तुर पीक शंभर टक्केच हातातून गेलेल आसल्यामुळे शेतकरी पीककर्ज भरू शकत नाही. बॅकानी पीककर्ज वसुलीसाठी तगादा सुरू केला. त्यामुळे शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. या विरोधात भूमिपुत्र लवकरच ' उध्दव सरकार, सातबारा कोरा केंव्हा करणार '  हे कॅम्पेन चालवणार आसल्याची माहीती विष्णुपंत भुतेकर यांनी दिली. सोबत केंद्र सरकारने वायदे बाजारातुन वगळण्यात आलेले सोयाबीन सह नव वाण पुन्हा समाविष्ट करण्यासाठी भूमिपुत्र कडुन राज्य व्यापी जण जागरण केले जाणार आसल्याचे सांगीतले.

 

 

 


0 Response to "आघाडी आणि भाजप च्या कुरघोडयांमुळे शेतकरी देशोधडीला"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article