-->

मतदार नोंदणीसाठी २८ व २९ नोव्हेंबरला विशेष शिबिरे

मतदार नोंदणीसाठी २८ व २९ नोव्हेंबरला विशेष शिबिरे

 


साप्ताहिक सागर आदित्य 

 मतदार नोंदणीसाठी २८ व २९ नोव्हेंबरला विशेष शिबिरे


वाशिम, : विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम-२०२६ अंतर्गत अनुपस्थित, स्थलांतरित, मृत किंवा दुबार  श्रेणीतील मतदारांना मतदार यादीत नाव नोंदविणे सुलभ व्हावे, यासाठी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर शनिवार, दि. २८ नोव्हेंबर आणि रविवार, दि. २९ नोव्हेंबर रोजी विशेष नोंदणी शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. 

तरी संबंधित नागरिकांनी शिबिरांद्वारे नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले आहे.


मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने यासंदर्भात सर्व जिल्हा निवडणूक अधिकारी आणि संबंधित यंत्रणांना निर्देश दिले आहेत. मोहिमेत दि. १८ ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत प्रपत्रांचे वितरण व संकलन केले जाईल. संकलित झालेली प्रपत्रे दि. १० डिसेंबर २०२६ पर्यंत निकाली काढण्यात येतील. दावे व हरकती निपटारा दि. १५ डिसेंबर २०२६ पर्यंत दावे आणि हरकतींवर निर्णय घेतला जाईल. अंतिम मतदार यादी दि. २२ डिसेंबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल.  


या विशेष शिबिरांचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन निवडणूक यंत्रणेकडून करण्यात आले आहे.  


0 Response to "मतदार नोंदणीसाठी २८ व २९ नोव्हेंबरला विशेष शिबिरे"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article