वाशिम जिल्ह्यात हमीभावाने कापूस खरेदीसाठी ४ केंद्रांवर ‘स्थानिक निगराणी समिती’ स्थापन
साप्ताहिक सागर आदित्य
वाशिम जिल्ह्यात हमीभावाने कापूस खरेदीसाठी ४ केंद्रांवर ‘स्थानिक निगराणी समिती’ स्थापन
📱 'कपास किसान ॲप'वर नोंदणीचे आवाहन
वाशिम,
हंगाम सन २०२६-२७ मध्ये भारतीय कपास निगम लिमिटेड मार्फत किमान आधारभूत किंमत (एमएसपी) योजनेअंतर्गत कापूस खरेदी पारदर्शक आणि प्रभावीपणे पार पाडण्यासाठी वाशिम जिल्ह्यात एकूण ४ खरेदी केंद्रांच्या ठिकाणी कायमस्वरूपी 'स्थानिक निगराणी समिती' स्थापन करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या मान्यतेने या समितीच्या स्थापनेचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
📱 'कपास किसान ॲप'द्वारे पूर्व नोंदणी आवश्यक
हमीदराने कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांना पूर्व नोंदणी करण्यासाठी भारतीय कपास निगम लि.ने 'कपास किसान' (Kapas Kisan) मोबाईल ॲप्लिकेशन उपलब्ध करून दिले आहे. ॲपद्वारे शेतकऱ्यांच्या जमिनीच्या नोंदी व कापूस लागवड क्षेत्राच्या तपशिलांची पडताळणी करण्यासाठी तालुका स्तरावरील सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांची 'नोडल अधिकारी' म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
📍 नियुक्त करण्यात आलेली ४ कापूस खरेदी केंद्रे:
१. अनसिंग (ता. वाशिम)
२. मंगरूळपीर
३. कारंजा
४. मानोरा
👥 स्थानिक निगराणी समितीची रचना
▪️ अध्यक्ष: संबंधित तालुक्याचे निवासी नायब तहसीलदार
▪️ सदस्य सचिव: सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था
▪️ सदस्य: तालुका कृषी अधिकारी, भारतीय कपास निगम लि. शाखा कार्यालय अकोला यांचेकडील नियुक्त केंद्र प्रमुख, आणि संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव.
📌 समितीची प्रमुख कार्ये व जबाबदाऱ्या:
▪️ 'कपास किसान ॲप'द्वारे शेतकऱ्यांच्या नोंदणीमधील अडचणी सोडवणे व ॲपबाबत व्यापक प्रसिद्धी देणे.
▪️ तालुक्यातील कापूस खरेदी प्रक्रियेवर प्रत्यक्ष देखरेख ठेवणे.
▪️ शेतकऱ्यांच्या प्राप्त तक्रारींचे त्वरित निवारण करणे व त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी विशेष हेल्पलाइन किंवा व्हॉट्सॲप क्रमांक उपलब्ध करून देणे.
▪️ स्थानिक निगराणी समितीच्या दरमहा सभा आयोजित करून वरिष्ठ कार्यालयाशी समन्वय साधणे व अहवाल सादर करणे.
🌾 जिल्ह्यातील कोणताही शेतकरी कापूस खरेदीपासून वंचित राहू नये, यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी आवश्यक ती कार्यवाही करावी असे निर्देश देण्यात आले आहेत.
#कापूसखरेदी #हमीभाव #MSP #कपासकिसानॲप #कापूसउत्पादकशेतकरी #स्थानिकनिगराणीसमिती #वाशिम
0 Response to "वाशिम जिल्ह्यात हमीभावाने कापूस खरेदीसाठी ४ केंद्रांवर ‘स्थानिक निगराणी समिती’ स्थापन"
Post a Comment