-->

अभिजात मराठीच्या वैभवाने उजळले जिल्हाधिकारी कार्यालय  जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केली प्रदर्शनाची पाहणी

अभिजात मराठीच्या वैभवाने उजळले जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केली प्रदर्शनाची पाहणी

 


 साप्ताहिक सागर आदित्य 

अभिजात मराठीच्या वैभवाने उजळले जिल्हाधिकारी कार्यालय

जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केली प्रदर्शनाची पाहणी


📖 संत साहित्य व सांस्कृतिक वारशाचे दर्शन; ग्रंथप्रदर्शनाला प्रतिसाद


वाशिम, 

महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या निर्देशानुसार वाशिम जिल्ह्यात दि. ३ ते ९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘अभिजात मराठी भाषा सन्मान दिवस’ व ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहाचे औचित्य साधून प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा प्रशासन व जिल्हा ग्रंथालय यांच्या वतीने विशेष ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन आज (दि.८) रोजी करण्यात आले.


या ग्रंथप्रदर्शनाला जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. पाहणीदरम्यान त्यांनी प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या विविध दुर्मीळ ग्रंथ, संत साहित्य, मराठी भाषा, इतिहास, संस्कृती आणि विविध विषयांवरील पुस्तकांची सविस्तर माहिती घेतली.


मराठी भाषेला मिळालेला अभिजात दर्जा, तिची समृद्ध साहित्यपरंपरा आणि सांस्कृतिक वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचावा, तसेच वाचनाची आवड रुजावी या उद्देशाने आयोजित या ग्रंथप्रदर्शनाला अधिकारी, कर्मचारी व नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.


या प्रसंगी जिल्हा ग्रंथालय अधिकारी बालाजी कातकडे, अधीक्षक सुनील घोडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


#अभिजातमराठी #मराठीभाषा #अभिजातमराठीभाषासप्ताह #ग्रंथप्रदर्शन #संतसाहित्य #वाचनसंस्कृती #वाशिम

0 Response to "अभिजात मराठीच्या वैभवाने उजळले जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केली प्रदर्शनाची पाहणी"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article