पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांची नागठाणा व वांगी येथील शेतशिवारांना भेट
साप्ताहिक सागर आदित्य
🌾 चारा व्यवस्थापनासाठी कुट्टी मशीन, मूरघास निर्मितीचा अवलंब करा
📢 पशुसंवर्धन विभागाचे आवाहन
🐄 पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांची नागठाणा व वांगी येथील शेतशिवारांना भेट
👨🌾 पशुपालकांना मार्गदर्शन
वाशिम, : पशुपालनातील चाऱ्यावरील खर्च कमी करण्यासोबतच चाऱ्याची पौष्टिकता टिकवून ठेवणे महत्त्वाचे आहे. चाऱ्याची नासाडी टाळण्यासाठी कुट्टी मशीनचा वापर, मूरघास निर्मिती तसेच विविध प्रक्रिया पद्धतींचा अवलंब करावा. पशुपालकांनी सोयाबीनचे कुटार भविष्यातील गरजेसाठी साठवून ठेवावे आणि त्यावर प्रक्रिया करून वापरावे, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. तुषार बावणे यांनी केले.
पशुसंवर्धन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज नागठाणा व वांगी येथील शेतशिवारांना भेट देऊन विविध शेतीपूरक व पशुपालन प्रकल्पांची पाहणी केली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना चारा व्यवस्थापन तसेच चाऱ्याची नासाडी रोखण्यासाठी करावयाच्या प्रक्रियांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
नागठाणा येथील प्रगतिशील शेतकरी रवींद्र दिलीप सोळंके यांच्या शेताला भेट देऊन गोशाळा, गांडूळ खत निर्मिती प्रकल्प आणि चारा पिकांची पाहणी करण्यात आली. तसेच वांगी येथील शेतकरी गोपाल ठाकरे व अक्षय ठाकरे यांच्या शेतातील जनावरांचा गोठा, पाण्याची उपलब्धता, गांडूळ खत निर्मिती आणि हिरवा चारा व्यवस्थापनाची पाहणी करण्यात आली.
या दौऱ्यात जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. तुषार बावणे, डॉ. योगिराज वंजारी, मुख्यमंत्री फेलो कृष्णकांत चव्हाण आणि नागठाणा पशुवैद्यकीय दवाखान्याचे ज्ञानेश्वर इढोळे यांनी प्रत्यक्ष प्रक्षेत्रांना भेटी देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला.
#चारा_व्यवस्थापन #कुट्टी_मशीन #मूरघास_निर्मिती #पशुसंवर्धन #पशुपालक #शेतकरी #वाशिम
0 Response to "पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांची नागठाणा व वांगी येथील शेतशिवारांना भेट"
Post a Comment